अबकी बार सव्वाशे पार! विधानसभा निवडणुकीत 125 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपने एक उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 125 जागा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे

लोकसभा निवडणुकीत 400पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवणाऱ्या भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. विरोधकांनी भाजपच्या 'अबकी बार चारसो पार'च्या घोषणेची खिल्लीही उडवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपने एक उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 125 जागा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांना आव्हान देण्यासाठी काँग्रेससह राशपचा बडा नेताही इच्छुक

NDTV मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनिती आखली आहे. या रणनिती अंतर्गत महाराष्ट्रातील सगळ्या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये भाजपला असे दिसून आले आहे की 50 जागांवर भाजपचे उमेदवार हमखास निवडून येतील. 75 जागा अशा आहेत जिथे भाजपला त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. या 75 जागांची जबाबदारी भाजपच्या 75 नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. एक नेता एक जिल्हा हे भाजपने सूत्र आखले असून या नेत्यांना त्यांच्या जिल्ह्याचा आढावा पक्ष नेतृत्वाला द्यावा लागणार आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंशी बातचीत होते मात्र.....

जागावाटपाची चर्चा तिघांमध्येच

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप कसे असावे याची चर्चा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या महायुतीच्या या तीन प्रमुख नेत्यांमध्येच होत आहे. जितकी जास्त लोकं तितकी चर्चा वाढत जाते आणि त्यातून वादाचे प्रसंग ओढावतात असा अनुभव आल्याने या तीन नेत्यांनी आपापसात बसून जागावाटप निश्चित करावे असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे तीन नेते एकत्र बसून यासंदर्भातील चर्चा करत असून अंतिम निर्णय आपापल्या पक्षातील इतर नेत्यांना कळवतील असे निश्चित झाले आहे.