'मी लढणारी आणि ठोकणारी,' पवारांची शिकवण सांगत चित्रा वाघ यांचा त्यांच्याच विश्वासू नेत्याला इशारा

Chitra Wagh : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर जोरदार हल्ला केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Chitra Wagh
मुंबई:

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

'मी घरी बसेन या भ्रमात राहू नका. पवार साहेब मी तुमच्याकडूनच शिकले आहे. रडायचं नाही लढायचं आहे. मी लढणारी आणि ठोकणारी आहे, या शब्दात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर हल्ला चढवला आहे. शरद पवार गटाचा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबून शेख यांनी चित्रा वाघ यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते, त्याला उत्तर देताना वाघ यांनी ही टीका आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

चित्रा वाघ यांनी या प्रकरणात बोलताना मेहबूब शेखवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे, त्याची आठवण करुन दिली. 'अरे कोण मेहबूब शेख, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.त्या महिलेला मी ओळखत नाही. ती माझ्याकडं आली होती. ज्या महिला माझ्याकडं येतात त्यांना मी मदत करते. त्यानंतर तिच्यावर दबाव टाकला. त्यानंतर पुन्हा ती माझ्याकडं आली दबाव असल्याचं सांगितलं. तिची मजबूरी मी समजू शकते. त्याबाबत कोर्टात मी केस लढत आहे.

हा मेहबूब शेख काय बोलतोय आणि काय नाही बोलतो त्याला माझ्या लेखी शून्य किंमत आहे. माझा नवरा सर्व दोषातून मुक्त झाला आहे. सन्माननीय उच्च न्यायालयानं त्यांना क्लीनचीट दिलीय. त्यामुळे हा काय बोलतोय, एक बलात्कारी काय बोलतोय याकडं फार लक्ष देण्यासारखं नाही.

Advertisement

( नक्की वाचा : 'मूठ उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना....' चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांना इशारा )
 

मी तुतारीवर आणि मेहबूब शेखवर बोलेन त्यावेळी माझ्यावर टीका केली जाईल हे मला माहिती आहे. महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करताना विरोधी पक्षांच्या महिलांवर पातळीहीन बोलणारा हा मेहबूब शेख त्यांना मान्य आहे. असे सतराशे साठ मेहबूब शेख घेऊन चित्रा वाघ फिरत असते. मला कितीही बोललं, पातळीहीन बोललं तरी मेहबूब शेख बलात्कारी आहे, हे कुणी पूसू शकणार नाही. माझी लढाई कोर्टात चालू आहे, मी ती लढतीय आणि लढणार आहे.

पवारसाहेब आणि सुप्रिया ताई तुमच्या पक्षाचा युवा अध्यक्ष काय म्हणतोय पाहिलं का? तुम्हाला चालत असेल, चालवून घ्या. आम्हीच महिलांची भलाई करतो ही भूमिका माननीय पवार साहेब आणि बारामतीच्या मोठ्या नेत्या सुप्रिया ताईंची आहे, ते तरी बोलू नका,' असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : बदलापूर प्रकरणानंतर प्रशासनात मोठा बदल, भाजपनेही आरोप केलेल्या अधिकाऱ्याची गृहखात्यात वर्णी )
 

मी घरी बसेन या भ्रमात राहू नका. पवार साहेब मी तुमच्याकडूनच शिकले आहे. रडायचं नाही लढायचं आहे. मी लढणारी आणि ठोकणारी आहे, या शब्दात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर हल्ला चढवला आहे. शरद पवार गटाचा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबून शेख यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना वाघ यांनी ही टीका आहे


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world