अमित शहांच्या उपस्थितीमध्ये मिथुन चक्रवर्तींचं खळबळजनक वक्तव्य, आम्ही त्यांना....

भाजपा नेते आणि ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती ( Mithun Chakraborty) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये (West Bengal)  भाजपाला मोठा फटका बसला. त्यानंतर राज्यात होणाऱ्या 6 विधानसभा पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी याच संदर्भात रविवारी कोलकाता दौरा केला. या दौऱ्यात झालेल्या एका सभेत भाजपा नेते आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती ( Mithun Chakraborty) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

74 वर्षांच्या मिथून यांनी सांगितलं, 'एका नेत्यानं सांगितलं होतं की आम्ही इथं 70 टक्के मुस्लीम आहोत. हिंदू 30 टक्के आहेत. हिंदूना कापून भागिरथीमध्ये (गंगा नदी) फेकून देऊ. मी त्यांना सांगतो, आम्ही तुम्हाला कापून भागीरथीमध्ये फेकणार नाही. पण, तुमच्याच जमिनीमध्ये तुम्हाला नक्की पुरुन टाकू.'

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे संदर्भ?

मिथुन चक्रवर्ती यांनी हे वक्तव्य TMC नेते कबीर यांच्या वक्तव्यानंतर केलं आहे. मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान कबीर यांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते एका सभेत म्हणाले होते की, ' तुम्ही (येथील लोकसंख्येत) 30 टक्के आहात. पण, आम्ही 70 टक्के आहोत. तुम्हाला वाटतंय की तुम्ही मशिद उद्धवस्त करु शकता आणि मुस्लीम शांत बसतील? तुम्ही चुकीचे आहात. तुम्हाला भागिरथीमध्ये बुडवलं नाही तर मी राजकारण सोडून देईन.

मिथुन चक्रवर्ती यांनी त्याला उत्तर देताना सांगितलं की, 'मी मुख्यमंत्री नाही. पण आम्ही बंगाल जिंकण्यासाठी काहीही करु. 2026 मधील विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपा सरकार येईल. भागीरथी आमची आई आहे. आम्ही तिच्या संरक्षणासाठी काहीही करु.' 

Advertisement

( नक्की वाचा : 6 कुतुबमिनारपेक्षाही उंच... सौदी अरेबिया असं काय बनवतंय ज्यावर संतापले आहेत जगभरातील मुस्लीम? )

अमित शाहांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की, 'आम्हाला पैसे घेणारे कार्यकर्ते नकोत. तुम्ही आमच्या एका झाडाचं फळ तोडलं तर आम्ही तुमच्या 4 झाडांचं फळ तोडू. मी पुन्हा-पुन्हा सांगतोय... आम्ही 2026 मधील निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करु. काहीही. मी इथं बसलेल्या गृहमंत्र्यासमोर बोलतोय, आम्ही काहीही करु.' मिथून चक्रवर्ती यांना 8 ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article