जाहिरात

6 कुतुबमिनारपेक्षाही उंच... सौदी अरेबिया असं काय बनवतंय ज्यावर संतापले आहेत जगभरातील मुस्लीम?

New Murabba City, Saudi Arebia : पश्चिम आशियातील बडी शक्ती म्हणून ओळखला जाणारा सौदी अरेबिया हा देश एक स्वप्नांचं शहर बनवणार आहे.

6 कुतुबमिनारपेक्षाही उंच... सौदी अरेबिया असं काय बनवतंय ज्यावर संतापले आहेत जगभरातील मुस्लीम?
मुंबई:

पश्चिम आशियातील बडी शक्ती म्हणून ओळखला जाणारा सौदी अरेबिया हा देश एक स्वप्नांचं शहर बनवणार आहे. या शहरात जगातील एक अभूतपूर्व गगनचुंबी इमारतीचं बांधकाम सुरु झालंय. 'न्यू मुरब्बा' (New Murabba) असं या शहराचं नाव आहे. साऊदी अरेबियाचा राजकुमार मोहम्मद बिन सलमानच्या नेतृत्त्वामध्ये राजधानी रियाधच्या मध्यभागी या हायटेक शहराची निर्मिती केली जात आहे.

सौदी अरेबियाचा हा प्रकल्प एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या 20 पट मोठा आहे. सौदीच्या व्हिजन 2030 अंतर्गत जगातील हे सर्वात आधुनिक शहर निर्माण केलं जाणार आहे. सौदी अरेबियाची ओळख बदलणाऱ्या या शहराच्या निर्मितीवर मुस्लीम मात्र नाराज आहेत. 

काय आहेत प्रोजेक्टची वैशिष्ट्ये?

  1. न्यू मुरब्बा डेव्हलपमेंट कंपनी या प्रोजेक्टची निर्माती आहे.
  2. याबाबतच्या रिपोर्टनुसार 19 चौरस किलोमीट परिसरात होणाऱ्या या नव्या प्रोजेक्टमध्ये 104,000 निवासी युनिट्स, 9 हजार हॉटेल रुम्स आणि  980,000 चौरस मिटरपेक्षा जास्त रिटेल भाग असेल.
  3. या हायटेक शहरातील मोठा भाग ऑफिससाठी राखून ठेवण्यात आला. कार्यालयांसाठी खास जागा तिथं विकसित करण्यात येणार आहे. 
  4. सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधीनुसार,  मुकाब 20 एम्पायर स्टेट इमारती ठेवण्याइतका मोठा असेल.
  5. मुकाबचा अरबी अर्थ घन (Cube) असा आहे.
  6. हे जगातील सर्वात मोठे इनडोर शहर असेल असा डेव्हलपर्सचं मत आहे.

कसं असेल हायटेक शहर?

  1. 'द मुकाब' हे मेगास्ट्रक्चर एक प्रस्तावित क्यूबिकल संरचना आहे. हे तयार झाल्यानंतर 1,300 फूट उंच आणि 1,200 फूट रुंद असेल. ही जगातील सर्वात मोठी इमारत संरचना बनेल
  2. या शहरात महागडी रेस्टॉरंट्स, दुकानं तसंच राहण्यासाठी सर्व अत्याधुनिक सोयींसह सज्ज घरं असतील. 
  3. या प्रकल्पातील इमारतींच्या बाहेरच्या भिंती या अभासी तंत्रज्ञानानं सजवण्यात येतील. त्यावर स्थानिकांना अद्भुत दृश्य पाहण्याचा आनंद मिळेल. 
  4. आतील भागात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे तयार करण्यात आलेले विशाल होलोग्राफिक प्रोजेक्शन्स असतील.

या सर्व वैशिष्ट्यांसह अनेक खास सुविधा देखील या शहारात देण्याचा सौदी अरेबियाचा विचार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार क्यूब-डिझाइन केलेल्या या मोठ्या शहराची रचना पारंपारिक नजदी स्थापत्य शैलीपासून प्रेरणा घेणारी असेल. हे जगातील पहिले इमर्सिव्ह डेस्टिनेशन असेल. 

या शहरात पायी चालणाऱ्यांना प्रसन्न वाटावं म्हणून ठिकठिकाणी झाडं लावण्यात येतील. सायकल चालण्यासाठी खास रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या शहरात इमर्सिव थिएटर तसंच 80 पेक्षा जास्त मनोरंजन आणि सांस्कृतिक केंद्र तयार करण्यात येणार आहेत. या शहराची दळणवळण व्यवस्था देखील हायटेक असेल.  विमानतळासह कोणत्याही भागात जाण्यासाठी 20 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल, याची खबरदारी घेऊन या शहराची निर्मिती केली जाणार आहे. 

2030 पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प


सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून सौदीमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा प्रोजेक्ट 2030 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यामध्ये 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल असा अंदाज आहे. 

हेकट चीननं का केलं पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन? समजून घ्या कारण

( नक्की वाचा : हेकट चीननं का केलं पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन? समजून घ्या कारण )

का होतीय टीका?

या शहराचा नकाशा काबा आणि मक्काशी साधर्म्य असणारं आहे. त्यामुळे अनेक मुसलमान यावर नाराज आहेत. इस्लाममध्ये ही सर्वात पवित्र क्षेत्र आहेत. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमाननं मागच्या वर्षी सौदी व्हिजन 2030 नुसार या प्रकल्पाची घोषणा केली होती. मानवाधिकार संघटनांनी देखील या प्रकल्पाच्या निर्मितीबाबत काळजी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प तयार करत असताना प्रवासी मजुरांचे शोषण करण्यात येईल तसंच अनेक स्थानिकांना यामुळे विस्थापित व्हावं लागेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
हेकट चीननं का केलं पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन? समजून घ्या कारण
6 कुतुबमिनारपेक्षाही उंच... सौदी अरेबिया असं काय बनवतंय ज्यावर संतापले आहेत जगभरातील मुस्लीम?
bangladeshi-mp-anawarul-azim-anar-murder-mystery
Next Article
'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला