Viral Video: भाजप आमदाराच्या मुलानं खरेदी केली 1111111 रुपयांची घोडी, खासीयतही भन्नाट, युद्धकाळात...

भाजप आमदार राहुल कुल यांचा मुलगा आदित्य कुलने 11 लाख 11 हजार 111 रुपयांना घोडी खरेदी केलीय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Aditya Kul Purchased Expensive Horse
मुंबई:

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी

BJP Mla Son Viral News : अनेक नेतेमंडळी राजकारणाच्या पलीकडे मोठ मोठे छंदही जोपासतात. कोणी प्राणीप्रेमी बनतो, तर कोणाला बैलगाडी शर्यतीचं वेड असतं. काही नेत्यांना घोड्यांच्या शर्यतीतही सहभाग घ्यायला आवडतं. जगभरात असे अनेक प्राणी आहेत, ज्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. विशेषत: दिग्गज सेलिब्रिटींच्या अश्वप्रेमाची खूप चर्चा रंगते. नंदूरबार सारंगखेडा येथील अश्व बाजार जगभरात प्रसिद्ध आहे.विविध राज्यातील व्यापारी अश्व विक्रीसाठी या बाजारात दाखल झाले आहेत. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा मुलगा आदित्य कुलने या अश्वबाजारात 11,11,111 रुपयांची घोडी खरेदी केली आहे. या घोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या अश्वाचे नेमकी खासीयत काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

दरवर्षी या अश्वबाजारात अनेक सेलिब्रिटी घोडे खरेदीसाठी येतात, कारण..

मिळालेल्या माहितीनुसार, सारंगखेडा येथील बाजारात विविध राज्यातील घोडे व्यापारी अश्वविक्री साठी दाखल झाले आहेत.दौंडचे आमदार राहुल कुल यांचा मुलगा आदित्यने येथील अश्व बाजारातून 11 लाख 11 हजार 111 रुपयांची घोडी खरेदी केली. या अश्वबाजारात दरवर्षी अनेक सेलिब्रिटी घोडे खरेदीसाठी येत असतात. जातिवंत व उमद्या घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेला सारंगखेडा येथील अश्वबाजार विविध प्रांतातील घोड्यांच्या आगमनाने बहरला आहे.घोडे बाजारात सुमारे 1800 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

नक्की वाचा >> लग्नात शाहरुख, सलमान, अक्षय कुमारला बोलवायचंय? परफॉर्मन्ससाठी किती घेतात फी? आकडा वाचून थक्कच व्हाल

आतापर्यंत घोड्यांच्या विक्रीतून 50 लाखांच्यावर उलाढाल झाली आहे.असे असले तरी युवराज,सुलतान,रुबी आणि मानसी या अश्वांची चर्चा असून अश्व शौकीन त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. भरतपूर (राजस्थान)येथील कृष्णवीरसिंग राजपूत यांच्या मालकीची 20 महिने वयाची नुकरा जातीची घोडी दौंडचे आमदार राहूल कुल यांचे पुत्र आदित्य याने 11 लाख 11 हजार 111 रुपयांमध्ये खरेदी केली.आदित्य पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज येथील लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. अश्वांची आवड असल्याने ही घोडी खरेदी केल्याचे आदित्यने म्हटलं आहे. सांगितले.मागील वर्षीही सारंगखेडा येथे एका घोड्याची खरेदी त्यांनी केली होती

नक्की वाचा >> गाडीचा नंबर MH 01..पीएम मोदींनी पुतिन यांना कोणत्या कारमध्ये बसवलं? देशभरात का होतेय 'या' SUV ची चर्चा?

अनेक ऐतिहासिक नोंदी

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा हे गाव तापी नदीकाठी वसलेले आहे.येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे.या ठिकाणच्या भरणाऱ्या यात्रा उत्सवाला 350 वर्षांची परंपरा आहे.येथील अश्व बाजार देशासह परदेशात प्रसिद्ध आहे.भारतातील पुष्करनंतर येथील अश्व बाजाराची गणना होते.या अश्व बाजाराबाबत अनेक पुरातन नोंदी आढळून येतात.इतिहास काळात श्री महाराणा प्रताप,श्री छत्रपती शिवाजी महाराज,श्री संभाजी महाराज यांनीही येथून घोडे खरेदी केल्याचे बोलले जाते.छत्रपती संभाजी महाराजांनी युद्ध काळात मुघलांशी लढताना या परिसरात तापीकाठी वास्तव्य केले असल्याची नोंद आहे.या ऐतिहासिक घोडेबाजारात घोडे खरेदी केल्याचीही नोंद आहे.याचा दाखला छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून देण्यात आला आहे.

Advertisement