President Putin India Visit Latest News : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. भारत आणि रशियामधील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः पालम विमानतळावर जाऊन पुतिन यांचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत टोयोटा फॉर्च्युनरमध्ये बसून विमानतळाबाहेर पडले. कडक सुरक्षा व्यवस्थेत रेड कार्पेटवर पुतिन आले आणि पंतप्रधान मोदींना पाहताच त्यांनी प्रथम हस्तांदोलन केले आणि नंतर मिठी मारली. या उत्साहपूर्ण भेटीनंतर दोन्ही नेते एकाच गाडीत बसून विमानतळावरून पुढे रवाना झाले.
भारतीय अधिकाऱ्यांची घेतली भेट
पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर पुतिन यांनी भारतीय अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यानंतर पुतिनच्या स्वागतासाठी विमानतळावरच नृत्य-संगीताचा कार्यक्रम झाला. तो पाहून पुतिन हसले आणि मग दोघेही एकाच गाडीत निघाले.
मोदी-पुतिनची ‘खास' सवारी
ज्या एसयूव्हीमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन बसले होते, ती 2024 टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) ची 4X2 डिझेल मॅन्युअल व्हेरिएंट आहे. मात्र, ही साधी फॉर्च्युनर नाही, तर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी अनेक खास बदल करून तयार करण्यात आलेली गाडी आहे.
नक्की वाचा >> Viral Video : पेट्रोल पंपावर तुमचीही फसवणूक होतेय? काय आहे '0' नंबर मीटर स्कॅम? ग्राहकाने केला पर्दाफाश
टोयोटा फॉर्च्युनरची खास वैशिष्ट्ये
ही दिसायला जरी साधी फॉर्च्युनर वाटत असली, तरी यात बुलेटप्रूफिंग आणि उत्कृष्ट सुरक्षा फीचर्स जोडले गेले आहेत. या सुरक्षा फीचर्समुळे याची किंमत नॉर्मल मॉडेलपेक्षा अनेक पटींनी वाढते. यात 2755 सीसीचे टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन सुमारे 201.15 हॉर्सपॉवरची ताकद आणि 420 Nm टॉर्क निर्माण करते. टोयोटा फॉर्च्युनर तिच्या मजबूत बिल्ड क्वालिटी आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते.
नक्की वाचा >> लग्नात शाहरुख, सलमान, अक्षय कुमारला बोलवायचंय? परफॉर्मन्ससाठी किती घेतात फी? आकडा वाचून थक्कच व्हाल
4X2 (टू-व्हील ड्राइव्ह) वर चालणारी ही 7-सीटर एसयूव्ही उत्कृष्ट ग्राउंड क्लीयरन्स आणि मजबूत सस्पेंशनमुळे खराब रस्त्यांवरही आरामदायी प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. यात 7 एअरबॅग्स, क्रूझ कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, रिव्हर्स कॅमेरा आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स आहेत. टोयोटा फॉर्च्युनरची किंमत 35 लाखांपासून 48 लाख रुपयांपर्यंत असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world