...तर उद्धव ठाकरेंचं ही स्वागत करू, फडणवीसांच्या जवळचा आमदार थेट बोलले

मुख्यमंत्री हा भाजपचा होणार हे जवळपास स्पष्ट आहे. पण या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमीका काय असणार हे स्पष्ट झाले नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

विधानसभा निवडणुकीत महायुतीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. नुसतं बहुमत मिळालं नाही तर बंपर बहुमत मिळालं. या आधी असं कधीच झालं नव्हतं ते या निवडणुकीत झालं. त्यामुळे महायुतीला अन्य कोणाच्याही मदतीची गरज नाही. सध्या मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नाही. मुख्यमंत्री हा भाजपचा होणार हे जवळपास स्पष्ट आहे. पण या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमीका काय असणार हे स्पष्ट झाले नाही. ते उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. शिवाय शिंदे नाराज असल्याचेही बोलले जाते. अशा वेळी उद्धव ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला तर त्याचे स्वागत करू असं वक्तव्य भाजप आमदारांने केलं आहे. हे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवी सरकारची स्थापना लवकर होईल. त्यात काही घाई नाही. भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला जातो असं वक्तव्य भाजप आमदार श्रीकांत भारती यांनी केलं आहे. ते पंढरपूर इथं दर्शनाला आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भाजपमध्ये जे निर्णय होतात ते विचारपूर्वक होतात. राज्याच्या हिताचा त्यात नक्कीच विचार केला जातो. निर्णय घेताना कधीही जात, धर्म, पंत डोळ्या समोर ठेवून निर्णय होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मराठा नेतृत्व आणि मराठेत्तर नेतृत्व याचा प्रश्न येत नाही. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - कोणाच्या वाट्याला कोणती खाती? शिंदे- पवारांच्या पदरात काय? संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली

मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केलं आहे. ओबीसी समाजही भाजपच्या मागे उभा राहीला. म्हणूनच 133  जागा निवडून आल्या. जे महायुती सरकारने काम केलं त्या आधारावर मतदान झाले, असंही ते म्हणाले. शिवाय हे सरकार प्रचंड ताकदीचे आहे. घट्ट आहे. त्यात एकनाथ शिंदे ही आहेत. ते आमचे नेते होते. त्यांचे ही मार्गदर्शन या नव्या सरकारमध्ये राहील असेही ते म्हणाले. त्यामुळे सरकारवर रिमोट कंट्रोल कोणाचा असेल की नाही या चर्चेला अर्थ नाही असंही त्यांनी सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Big News : एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार, खात्रीलायक सूत्रांची माहिती

दरम्यान त्यांना उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ही ते स्पष्ट पणे बोलले. सध्या कोणाच्या मदतीची सरकारला गरज नाही. सरकार भक्कम आहे. पण महाराष्ट्राच्या हितासाठी जर ठाकरेंनी आम्हाला सभागृहात पाठिंबा दिला तर त्याचे आम्ही नक्कीच स्वागत करू असंही श्रीकांत भारती म्हणाले. श्रीकांत भारती हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे ठाकरें बाबत त्यांनी केलेल्या वक्तव्या मुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

Advertisement