जाहिरात

कोणाच्या वाट्याला कोणती खाती? शिंदे- पवारांच्या पदरात काय? संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली

महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार आहे. त्यासाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या अनेक इच्छुकांनी मंत्रिपदासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू केली आहे.

कोणाच्या वाट्याला कोणती खाती?  शिंदे- पवारांच्या पदरात काय? संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली
मुंबई:

महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. पण ते कधी स्थापन होणार याची मात्र सर्वांनाच प्रतिक्षा आहे. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे. तर दोन उपमुख्यमंत्री असणार हे ही स्पष्ट आहे. त्यानंतर कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणती खाती येणार याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगली खाती मिळाली यासाठी रस्सीखेच सुरू आहे.  शिवाय अधिकची मंत्रीपदं मिळाली यासाठीही शिंदे पवार आग्रही असल्याचे समोर येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्रिपद हे भाजपच्या वाट्याला जाणार आहे. तर दोन उपमुख्यमंत्री असणार आहे. एक शिवसेनेच्या वाट्याला तर दुसरं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. या शिवाय चांगली खाती मिळावी यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. गृह खातं मिळावं यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. तर अजित पवारांनी अर्थ खात्यावर दावा केला आहे. गृह खातं एकनाथ शिंदेंना सोडण्यास भाजपनं नकार दिला आहे. पण अर्थ खातं अजित पवारांना देण्याची भाजपची तयारी आहे. त्यामुळे सध्या खाते वाटपाचा पेच फसला आहे.      

भाजपच्या वाट्याला कोणती खाती? 

भाजपने गृह खात्यावर दावा केला आहे. हे खातं सोडण्याच्या तयारीत भाजप नाही. हे खातं फडणवीस स्वत:कडे ठेवतील अशी चिन्ह आहेत. या शिवाय सामान्य प्रशासन,ऊर्जा,महसूल,सार्वजनिक बांधकाम,गृहनिर्माण,जलसंपदा,कामगार,ओबीसी मंत्रालय,ग्रामविकास,वन पर्यटन आणि वैद्यकिय शिक्षण या खात्यांवर दावा केला आहे. यातील एखादं खातं भाजप मित्र पक्षांसाठी सोडू शकेल. पण गृह आणि महसूल सारखी महत्वाची खाती ही भाजपकडेच राहातली अशी स्थिती आहे. 

ट्रेंडिंग बातमी - लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार? आता या महिलांनाच मिळणार लाभ

शिंदे शिवसेना गटाचा दावा 

शिवसेना शिंदे गटाला मुख्यमंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे या पदासाठी आग्रही होते. पण त्यांचा आग्रह भाजप श्रेष्ठींनी मान्य केला नाही. त्यामुळे चांगली खाती मिळावीत यासाठी शिंदे प्रयत्नशिल आहे. प्राथमिक चर्चेत शिंदेंच्या वाट्याला नगरविकास, उद्योग,शिक्षण,परिवहन,सामाजिक न्याय,आदिवासी विकास,पाणीपुरवठा,पशुसंवर्धन,पणन,आपत्ती व्यवस्थापन,माहिती जनसंपर्क, माहिती व तंत्रज्ञान ही खाती येण्याची दाट शक्यत आहे. पण शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदा बरोबरच गृहमंत्रीपद हवं आहे. ते भाजप सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Big News : एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार, खात्रीलायक सूत्रांची माहिती

अजित पवारांच्या वाट्याला काय? 

उपमुख्यमंत्रिपद अजित पवारांच्या वाट्याला येणार आहे. शिवाय त्यांची अर्थ खात्याची मागणीही पुर्ण होणार आहे. त्यामुळे अजित पवार हे महायुतीत सर्वात आनंदी आहेत. या बरोबरच सहकार, कृषी,अन्न व औषध प्रशासन,मदत व पुनर्वसन, पर्यावरण,युवक कल्याण व क्रीडा,महिला व बालकल्याण ही खाती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. आधीच्या महायुती सरकारमध्ये हीच खाती अजित पवारांच्या ताब्यात होती. तिच खाती आता अजित पवारांना मिळणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार; मात्र CM शिंदेंनी अमित शाहांकडे काय मागितलं?

मंत्रिपदासाठी अनेकांची लॉबिंग 

महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार आहे. त्यासाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या अनेक इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केली आहे. भाजपमध्ये मंत्रिपद मिळावे यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. काही नव्या चेहऱ्यांना भाजप संधी देईल अशी चर्चा आहे. त्यासाठी काही वरिष्ठ मंत्र्यांना डावललं जाणार आहे. शिवसेना शिंदे गटातही आधी संधी मिळालेल्या मंत्र्यांना पुन्हा संधी नको अशी मागणी होत आहे. ज्यांनी संधी मिळाली नाही त्यांना मंत्री करावे अशी मागणी होत आहे. यावेळी तरी आपल्याला न्याय मिळेल असं भरत गोगावले आणि संजय शिरसाट हे जाहीर पणे बोलत आहेत. अजित पवारांनाही मंत्रीपद देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहावे लागणार आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com