'आमचे पैसे घेऊन काँग्रेसचे काम केलं, आम्हाला युती धर्म शिकवता का?' भाजप राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर

शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाकयुद्ध रंगलं असताना आता भाजपनेही त्यात उडी घेत, राष्ट्रवादी काँग्रेसलाच लक्ष केले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
लातूर:

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी महायुतीत शाब्दीक चकमकी वाढल्या आहेत. त्यामुळे महायुतीतलं वातावरण गढूळ झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करताना त्यांच्या बाजूला जरी बसलो असलो तरी बाहेर आल्यावर उलटी होते असे वक्तव्य करत वातावरण तापवलं होते. तर सावंत यांची हाकालपट्टी करा नाही तर आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर पडतो अशी प्रतिक्रीय राष्ट्रवादीकडून आली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाकयुद्ध रंगलं असताना आता भाजपनेही त्यात उडी घेत, राष्ट्रवादी काँग्रेसलाच लक्ष केले आहे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीतलं वातावरण सध्या वाकयुद्धाने ढवळून निघाले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गणेश हाके हे भाजपचे प्रदेश प्रवक्ते आहेत. सध्या भाजपची राज्यात जनसंवाद यात्रा सुरू आहे. हाके या यात्रेच्या निमित्ताने अहमदपूर विधानसभा मतदार संघात आहेत. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टिका केली. त्यांच्या आक्रमक वक्तव्याने महायुतीत सर्व काठी ठिक नाही अशीच स्थिती दिसत आहे. अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे, असे हाके म्हणाले. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंघाशी संघ म्हणतात असा संघ आमच्यासोबत घडवला आहे अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला

हाके येवढ्यावर थांबले नाहीत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने भाजपचे काम केले नाही. उलट आमचेच पैसे घेऊन काँग्रेसचे काम केले असा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजपच्या उमेदवाराला पाडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले असेही ते म्हणाले. सध्या अजित पवार गटाचेच आमदार अहमदपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते म्हणतात आपली युती आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का ? असा प्रश्न हाके यांनी केला आहे. महायुतीचा धर्म एकट्याने आम्हीच पाळायचा का ? असं म्हणत अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे असे ते पुन्हा एकदा म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, उपाध्यक्ष अशोक केद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले. शिवाय अहमदपूर विधानसभेसाठी दावा ही केला आहे. यातून मात्र महायुतीतील वाद थांबताना दिसत नाही. शिवसेना असो की भाजप असो दोन्ही पक्षांच्या रडारवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे अजित पवारांचेही टेन्शन वाढले आहे. अशा स्थितीत विधानसभेला दगा फटका होणार का याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.  
 

Advertisement