जाहिरात

BMC Election 2025: मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार ? वाचा Inside स्टोरी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक सर्वेक्षण केले आहे.

BMC Election 2025: मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार ? वाचा Inside स्टोरी
मुंबई:

मुंबई महानगरपालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या कधी होणार याची स्पष्टता अद्याप नसली तरी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली होती. या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांची प्रतिष्ठा पणाला लागणारच आहे. शिवाय केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीसाठी एकत्र निवडणुका लढवण्यासंदर्भात अद्याप एकमत झालेले दिसत नाही. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची शक्यता आहे.  महायुतीमध्येदेखील ही निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भात अद्याप एकमत झालेले नाही. या अनुषंगाने राजकीय पातळीवर घडत असलेल्या घडामोडी पाहाता भाजपदेखील स्वबळावर लढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई महापालिकेचे 227 प्रभाग आहेत. 21 फेब्रुवारी 2017 रोजी मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणाला मिळाले नव्हते. मात्र त्यावेळी एकसंध असलेली शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष बनला होता. भाजप दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला होता. या निवडणुकीनंतर शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान झाला होता. मार्च 2022 मध्ये 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर महापालिकेचा कारभार आतापर्यंत प्रशासक सांभाळत आहे. प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कामकाज पाहात आहेत. 

ट्रेंडिंग बातमी -  Solapur News: प्रेमविवाह केला, संसारात हुंड्याचा अडथळा आला, गर्भवती विवाहितेचा शेवट भयंकर झाला

2017 च्या निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे 

  • शिवसेना (एकसंध): 84 नगरसेवक
  • भाजप: 80 नगरसेवक
  • काँग्रेस: 31 नगरसेवक
  • राष्ट्रवादी काँग्रेस (एकसंध): 9 नगरसेवक
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे): 7 नगरसेवक
  • समाजवादी पक्ष: 6 नगरसेवक
  • ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM): 2 नगरसेवक

2017 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेने मनसेचे 6 नगरसेवक आपल्याकडे वळवले होते. 3 अपक्षही शिवसेनेत आले होते. असे मिळून त्यावेळच्या एकसंध शिवसेनेच्या नगरसेवकांची एकूण संख्या 93 झाली होती. एकसंध शिवसेनेतील एकूण 48 नगरसेवक सध्या शिंदेसोबत आहेत. येत्या काळात ही संख्या आणखी वाढेल असा दावा शिंदेच्या शिवसेनेकडून केला जातोय. शिंदेंच्या शिवसेनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 नगरसेवकांनीही प्रवेश केला होता. असे मिळून शिंदेंच्या शिवसेनेसोबत सध्या 56 माजी नगरसेवक आहेत.  

ट्रेंडिंग बातमी - Laxman Hake: 'पगार बुडवला, धमकी दिली, पत्नीला नोकरीचं खोटं आश्वासन', OBC नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक सर्वेक्षण केले आहे. भाजपने मुंबईत अधिक जागा लढल्यास त्याचा थेट फायदा होईल. असे या सर्वेक्षणातून भाजपला कळाल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीतून कळाले आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन जरी निवडणूक लढवली तरी भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होणार नाही असेही सर्वेक्षणातून भाजपला दिसून आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप ही  स्वबळावर लढायचे का याची चाचपणी आतापासूनच करत आहे. त्या दृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com