जाहिरात

Laxman Hake: 'पगार बुडवला, धमकी दिली, पत्नीला नोकरीचं खोटं आश्वासन', OBC नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप

उलट त्यांनी आपल्या छोट्या भावाला धमकी दिली होती. जर पगार मागितला तर तुझ्यावर केस करेन असा आरोप होत आहे.

Laxman Hake: 'पगार बुडवला, धमकी दिली, पत्नीला नोकरीचं खोटं आश्वासन', OBC नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप
सोलापूर:

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यावर त्यांच्याच ड्रायव्हरने गंभीर आरोप केले आहेत. पगार बुडवला, त्याची विचारणा केली तर पत्नीला नोकरी लावण्याचं आश्वासन दिलं. पण ते ही पूर्ण केलं नाही. उलट धमकी दिली असा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण हाके हे ओबीसींचे नेते म्हणून समोर आले आहेत. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी जशाच तसे उत्तर दिले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. मात्र आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सचिन बंडगर हे मुळचे सांगोला जिल्ह्यातील मऊदचे रहिवाशी आहेत. ते ओबीसी समाजाचे असून ते नेहमी लक्ष्मण हाके यांच्या बरोबर राहीले आहेत. शिवाय त्यांनी हाकेंचे ड्राव्हर म्हणून काम केल्याचा त्यांचा दावा आहे. हाकेंचे सोशल मीडिया सांभाळण्याची जबाबदारी ही बंडगर यांच्यावर होती असं ही त्यांनी सांगितलं आहे. यासाठी बंडगर यांना पगार ठरला होता. जवळपास चार वर्ष ते हाकेंकडे होते. पण या काळात चार महिने सोडले तर त्यांना पगार मिळाला नाही असा आरोप बंडगर यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Nashik News: संजय राऊतांचा एक फोन.. अखेर 'त्या' बड्या नेत्याची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

सोशल मीडियासाठी ही काही पैसे देण्याचे ठरले होते. ते ही पैसे आपल्याला मिळाले नाहीत असं बंडगर म्हणाले. हाके यांनी गोडबोलून आपल्याकडून काम करून घेतली. शिवाय तुझ्या पत्नीला नोकरीला लावतो असे आश्वासही त्यांनी दिले होते. पण तसे काहीच केले नाही. पुढे आपला मुलगा आजारी होता. पैशांची गरज होती. त्यावेळी त्यांच्याकडे राहीलेला पगार आपण मागितला. पण त्यांनी ना आपला फोन उचलला नाही मेसेजला कोणते उत्तर दिले. दोन महिने हा प्रकार सुरू होता असा आरोपही बंडगर यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  Rohit Pawar : "अजित पवार पक्षात एकटे पडलेत"; रोहित पवार असं का म्हणाले?

उलट आपल्या छोट्या भावाला हाके यांनी धमकी दिली होती. जर पगार मागितला तर तुझ्यावर केस करेन. मला वाय दर्जाची सुरक्षा आहे असं त्यांनी सांगितलं. आपण त्यांच्याकडे प्रमाणिक पणे काम केले. त्यामुळे त्यांनी आपला पगार प्रामाणिक पणे द्यावा अशी विनंतर सचिन बंडगर याने केला आहे. लक्ष्मण हाके यांच्या ड्रायव्हर संदर्भात नुकतेच आमदार अमोल मिटकरी यांनी ही ट्विट केले होते. यानंतर आता सचिन बंडगर हे पुढे आले आहेत. याबाबत लक्ष्मण हाकेंची बाजू मात्र समजू शकलेली नाही. काही दिवसा पूर्वी ओबीसी समाजाने याच हाके यांना फॉर्च्यूनर गाडी दिली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com