जुई जाधव, प्रतिनिधी
BMC Election 2026 Congress Winner List : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईत काँग्रेस 24 जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.परंतु, काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षातूनच टीकेची झोड उठवण्यात आली आहे. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे मुंबई काँग्रेसमधील गटबाजी आता पुन्हा एकदा उफाळून आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. या निकालांचे पडसाद आता राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जगतापांनी गायकवाडांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे. दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाला एकसंध ठेवण्याचे काम गायकवाड यांनी केली आहे, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.
'काँग्रेस पक्षाने पुढच्या वाटचालीकडे लक्ष देणं गरजेचं आह. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा पक्ष बळकट करण्यावर अधिक भर दिला पाहिजे',असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढाई होती.मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानेपराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहेत. काँग्रेस हायकमांड आता मुंबई काँग्रेसमधील या वादात हस्तक्षेप करणार का? वर्षा गायकवाड आपल्या पदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा >> Pimpari-Chinchwad Winners List : पिंपरी-चिंचवडच्या सर्व 32 प्रभागाच्या विजयी उमेदवारांची यादी, वाचा सर्व नावे
काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची नावे
- डॉ. अजंता यादव - प्रभाग क्रमांक 28
- कमरजहाँ मोहम्मद मोईन सिद्दीकी - प्रभाग क्रमांक 33
- हैदर अस्लम शेख - प्रभाग क्रमांक 34
- रफिक इलियास शेख - प्रभाग क्रमांक 48
- संगीता कोळी - प्रभाग क्रमांक 49
- दिव्या अवनीश सिंग - प्रभाग क्रमांक 61
- मेहेर मोहसीन हैदर - प्रभाग क्रमांक 66
- ॲड. ट्युलिप मिरांडा - प्रभाग क्रमांक 90
- मोहम्मद इब्राहिम मोहम्मद इक्बाल कुरेशी - प्रभाग क्रमांक 92
- कॅरेन सेसिलिया डी'मेलो - प्रभाग क्रमांक 101
- रहेबर (राजा) सिराज खान - प्रभाग क्रमांक 102
- आशा सुरेश कोपरकर - प्रभाग क्रमांक 110
- वैशाली अजित शेडकर - प्रभाग क्रमांक 150
- खान मोहम्मद आमीर आरिफ - प्रभाग क्रमांक 162
नक्की वाचा >> BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेत कोण कोण झाले नगरसेवक? पाहा सर्व विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
- मोहम्मद अशरफ आझमी - प्रभाग क्रमांक 165
- डॉ. समन अर्शद आझमी - प्रभाग क्रमांक 167
- आयेशा सुफियान वानू - प्रभाग क्रमांक 179
- आशा दीपक काळे - प्रभाग क्रमांक 183
- साजिदा बी बब्बू खान - प्रभाग क्रमांक 184
- खान मोहम्मद वकार नासीर अहमद - प्रभाग क्रमांक 211
- नसीमा जावेद जुनेजा - प्रभाग क्रमांक 213
- राजश्री महेश भातणकर - प्रभाग क्रमांक 216
- ध्यानराज यशवंत निकम - प्रभाग क्रमांक 223
- रुखसाना अमीन परक - प्रभाग क्रमांक 224