महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी वारंवार केली जाते. सर्व पक्षातील नेते ही मागणी गेले कित्येक वर्षापासून करत आले आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या निमित्तानेही अनेकांनी भारतरत्न पुरस्काराची मागणी केली. त्यांचा चांगलाच समाचार आपल्या खास शैलीत जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतला. शिवाय शरद पवारां समोरच त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी महात्मा आणि भारतरत्न यातला फरकच यावेळी सर्वां समोर मांडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चाकण इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शरद पवार आणि छगन भुजबळ हे जेष्ठ नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना छगन भुजबळांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. शिवाय त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. त्या विषयाला ही हात घातला.
ट्रेंडिंग बातमी - Mumbra Contro: मुंब्र्यात मराठीचा आग्रह, जितेंद्र आव्हाड म्हणतात हा तर...
ही मागणी करणाऱ्यांनी त्यांनी एक प्रश्न विचारला. महात्मा मोठे की भारतरत्न मोठे? देशात बरेच भारतरत्न आहेत. पण महात्मा किती आहेत? असं ही ते म्हणाले. महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले हे महात्मा आहेत. ते महात्मे आहेत त्यांना महात्मेच राहू द्या. महात्म ज्योतीबा फुलेंना खाली आणण्याचा प्रयत्न करु नका. महात्मा ज्योतिबा फुले या नावातच सर्व काही येतं. त्यामुळे अन्य कोणत्या उपाधीची गरज नाही असं आपलं वैयक्तीक मत असल्याचं यावेळी भुजबळ म्हणाले. भारतरत्न पेक्षा महात्मा हा ज्योतिबा फुलेंचा किती तरी मोठा सन्मान आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.
शरद पवारांनीही यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. सर्व सामान्यांची काळजी असणारं हे दाम्पत्य होतं. समाज सेवेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून दिलं होतं असंही पवार यावेळी म्हणाले. शिवाय चाकण इथं उभे राहीलेल्या स्मारकाबाबत त्यांनी आनंदही व्यक्त केला. दरम्यान पवार आणि भुजबळ एकाच मंचावर येणार असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. पण पवार याबाबत काही बोलले नाही. पण भुजबळांनी मात्र यावर भाष्य केलं. फुले, शाहू महाराज, आंबेडकर, ही आमची दैवत आहे. त्यांचा कार्यक्रम जिथे जिथे असेल तिथे तिथे आम्ही जाणार. यातून राजकीय चिंता व्यक्त करू नका असं भुजबळ म्हणाले.