जाहिरात

'निवडणुकीनंतर सर्वांचे विमान जमिनीवर येईल' भुजबळांचा रोख कोणाकडे?

विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांचे विमान जमिनीवर येईल. सध्या सर्वच जण हवेत आहेत. पण हे त्यांचे विमान विधानसभा निवडणुकीनंतर जमिनीवर येईल असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

'निवडणुकीनंतर सर्वांचे विमान जमिनीवर येईल' भुजबळांचा रोख कोणाकडे?
नाशिक:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. सध्या ते त्यांचा मतदार संघ असलेल्या येवल्यामध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांची गाठीभेटी आणि सभा सुरू आहेत. अशा वेळी त्यांनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांचे विमान जमिनीवर येईल. सध्या सर्वच जण हवेत आहेत. पण हे त्यांचे विमान विधानसभा निवडणुकीनंतर जमिनीवर येईल असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र हा टोला नक्की भुजबळांचा कोणाला होता याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छगन भुजबळे हे महायुतीतले मोठे नेते आहेत. सध्या ते युती सरकारमध्ये मंत्री आहेत. लोकसभा निवडणूक त्यांना लढवायची होती. पण जागा न सुटल्याने त्यांना उमेदवारी ही मिळाली नाही. त्यानंतर राज्यसभेवरही त्यांना जाता आले नाहीत. त्यानंतर भुजबळ हे थोडे मतदार संघा पुरता मर्यादीत झाले. त्यांच्या भूमिकेला महायुतीतल्या घटक पक्षाने विरोधही दर्शवला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी तर भुजबळांवर थेट टिका केली. जास्तीत जास्त जागा महायुतीत मिळाव्यात यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. शिवाय काही सर्वे ही समोर आले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - NDTV मराठीचा दणका! अखेर त्या सातबाऱ्यावरचे 'पाकिस्तान' हे नाव हटवले

विधानसभा निवडणुकीचे जे सर्वे समोर येत आहेत त्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार टक्क होणार हे स्पष्ट आहे. शिवाय काही सर्वे महायुतीचं सरकार येणार असं सांगत आहेत. तर काही सर्वे मध्ये महाविकास आघाडी मुसंडी मारताना दिसत आहेत. या बाबत छगन भुजबळ यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने असे विविध पक्षाचे वेगवेगळे आकडे फिरणारच आहेत. सर्वच म्हणतात आम्ही पुढे आहोत. ज्यावेळी निवडणुकीचे निकाल लागतील, त्यावेळी सर्वांचे विमान खाली येईल अशी प्रतिक्रीया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - भावी मुख्यमंत्री! महायुतीत आता 'या' दोन नेत्यांचे झळकले बॅनर

त्यामुळे हे विमान नक्की कोणाचे खाली येणार याची चर्चा सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीला हा टोला होता की महायुतीला हा टोला होता याचीच चर्चा सध्या सुरू झाली आहे. दरम्यान महायुतीच्या घटक पक्षात काही मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत हे वृत्त  ही त्यांनी फेटाळून लावले आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांना न्याय मिळेल असे भुजबळ  म्हणाले. छगन भुजबळ हे महायुतीकडून येवल्यातून पुन्हा एकदा मैदानात असतील हे निश्चित आहे. सध्या ते मतदार संघ पिंजून काढत आहेत. मात्र ते पक्षात सध्या नाराज असल्याची चर्चा आहे. 

ट्रेंडिंग बातमी - CM Arvind Kejriwal resigns : केजरीवालांची मोठी घोषणा, 2 दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन!

छगन भुजबळ पहिल्या ऐवढी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याचे दिसत नाही अशीही चर्चा आहे. ते मतदार संघात असतात. राज्याचा मोठा नेता म्हणून त्यांचा उल्लेख होतो. पण राज्य स्तरावर ते फिरताना ते सध्या दिसत नाही. शिवाय लोकसभा आणि राज्यसभेवा डावललं गेल्याने ही ते नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवाय ते मनोज जरांगे पाटील यांनाही आव्हान देताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षातील एक गट भुजबळांच्या विरोधात गेला आहे. म्हणूनच कदाचित निवडणुकीनंतर सर्वांचे विमान जमिनीवर येईल असे वक्तव्य भुजबळांनी केल्याचं बोललं जात आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
CM Arvind Kejriwal resigns : केजरीवाल का देत आहेत राजीनामा? काय आहे खरं कारण?
'निवडणुकीनंतर सर्वांचे विमान जमिनीवर येईल' भुजबळांचा रोख कोणाकडे?
uddhav-thackeray-big-statement-on-chief-minister-position
Next Article
'मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नाही' ठाकरेंनी माघार का घेतली? थेट कारण सांगितलं