
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं. त्यांना मंत्रीपद देण्यात आलं नाही. त्यानंतर भुजबळ हे नाराज होते. त्यांना राज्यभरात आपल्या समर्थकांचे मेळावे ही घेतले होते. शिवाय त्यावेळी ते भाजप नेत्यांनाही भेटले होते. अशा स्थितीत ते राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा होती. मात्र त्याच काळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. पुढे भुजबळांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर NDTV मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंत्रीपद मिळालं नाही यामुळे निराश झाला होतो. नाराज झालो होतो अशी स्पष्ट कबुली छगन भुजबळ यांनी दिली आहे. तुम्ही नाराज होता. त्यावेळी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. हे खरं आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की मंत्रीपद न मिळाल्याने त्यावेळी मी नाराज होतो. शिवाय भाजपमध्ये जावू शकलो असतो, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
त्यापुढे जावून भुजबळ म्हणाले की फक्त भाजपच नव्हे तर इतर अनेक पक्षांतूनही त्यावेळी आपल्याला ऑफर होत्या, असं ही त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळात आपला प्रवेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते, असंही छगन भुजबळ यावेळी म्हणालेत. मंत्रिपदी वर्णी लागलेल्या भुजबळांची बेधडक मुलाखत एनडीटीव्ही मराठीला दिली. त्यात त्यांनी हे खुलासे केले आहेत. मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भुजबळांचे जंगी स्वागत त्यांच्या मतदार संघात करण्यात आले होते.
ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai News: चमत्कार! 15 मिनिटे हृदय बंद, तरीही जीव वाचला, हे कसं शक्य झालं?
छगन भुजबळ यांच्या ऐवजी मंत्रीमंडळात धनंजय मुंडे यांची वर्णी लागली होती. शिवाय नाशिक मधून माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला होता. त्यामुळे भुजबळ हे चांगलेच संतापले होते. मात्र संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या जागी भुजबळांची वर्णी लागणार अशी चर्चा होती. अखेर भुजबळांची प्रतिक्षा संपली. त्यांचे मंत्रीमंडळात पुन्हा प्रवेश झाला. त्यामुळे भुजबळ आता समाधानी आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world