एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला. मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं त्यांनी सांगितलं. सत्ता स्थापनेत आपला अडथळा असणार नाही असंही ते म्हणाले. त्यांच्या या निर्णयानंतर शिंदेंच्या जवळच्या शिलेदारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सच्चा शिवसैनिक कसा असतो हे आज शिंदेंनी दाखवून दिलं असं दिपक केसरकर म्हणाले. तर अजूनही शिंदेंनी दावा सोडला नाही असं म्हणत मुख्यमंत्रिपदाची आस अजूनही अर्जुन खोतकर यांनी जिवंत ठेवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिंदे यांनी ज्या पद्धतीचा निर्णय घेतला ती शिवसेनेची शिकवण आहे. आनंद दिघे यांची शिकवण आहे. बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण आहे. त्याला अनुसरूनच एकनाथ यांना ही निर्णय घेतला, असी प्रतिक्रिया दिपक केसरकर यांनी दिला आहे. निष्ठा म्हणजे निष्ठा. वरिष्ठ सांगतील तो आदेश पाळायचा आहे. जे बाळकडू बाळासाहेबांकडून मिळालं त्याची प्रचिती आज आली असंही ते म्हणाले. खरा शिवसैनिक कसा असतो हे आज देशाने बघितले. कुठली अट न ठेवता खुल्या मनाने एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असंही ते यावेळी म्हणाले. शिंदे ज्या ही कोणत्या पदावर असतील तिथून ते जनतेला न्याय देतील असंही त्यांनी सांगितलं. नेतृत्वाची लढाई होणार होती हे आम्हाला माहित होतं. पण त्यातून मार्ग निघाला आहे असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - सरकार स्थापने आधीच महायुतीत वादाची ठिणगी, थेट बाप काढला
दिपक केसरकरांनी आपली भावना वक्त केल्यानंतर अर्जुन खोतकर ही याबाबत बोलले आहेत. त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडलेला नाही. उलट त्यांनी असं सांगितलं की जो निर्णय मोदी आणि अमित शहा घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला सांगणे म्हणजे पदावरचा दावा सोडणे असा होत नाही. त्याबाबत आत मोदी आणि शहा निर्णय घेतली. त्यांचा निर्णय काही असू शकतो असंही ते म्हणाले. त्यामुळे कदाचित मोदी आणि शाह एकनाथ शिंदे यांचे नावही जाहीर करू शकतात अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार
तर एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेते म्हणून भरत गोगावले यांचे नाव घेतले जाते. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर त्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी वस्तुस्थिती बघून निर्णय घेतला असं ते म्हणाले. आम्ही आमचे सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे त्यांनी नक्कीच विचारपूर्वक निर्णय घेतला असेल. महायुती भक्कम रहावी असं आम्हाला वाटत आहे असंही ते म्हणाले.