सावंतवाडीत महायुतीतच जुंपली, मंत्र्याला थेट भाजप नेत्याचे आव्हान

यावेळी तेली पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे केसरकर विरूद्ध तेली असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
सावंतवाडी:

गुरुप्रसाद दळवी 

सावंतवाडी मतदार संघात भाजपचे माजी आमदार राजन तेली व शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दीपक केसरकर हे प्रबळ दावेदार असून चौथ्यांदा ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र राजन तेली हे भाजपकडूनही इच्छुक असल्याने दीपक केसरकरांवर टीका करण्याची एकही ते संधी सोडत नाहीत. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाची जागा असं महायुतीत सुत्र ठरलं आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची जागा ही शिवसेना शिंदे गटाला जाणार हे जवळपास निश्चित आहे. राजन तेलींनी या जागेवर दावा केला आहे. त्यातून सध्या महायुतीतल्या या दोन्ही नेत्यांत शाब्दीक चकमकी उडताना दिसत आहेत.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गणेश उत्सवाच्या काळात राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला आहे. त्यामुळे सावंतवाडीत सध्या शाब्दीक राजकीय फटाके फूटताना दिसत आहेत. दिपक केसरकर माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत. मात्र त्या माणसाचा उपयोग या मतदार संघाला होणार नसेल, तर आम्ही युती म्हणून त्यांना मदत केली तर सावंतवाडीची जनता आम्हाला माफ करणार नाही, असे वक्तव्य राजन तेली यांनी केले आहे. केसरकर हे  15 वर्ष आमदार आहेत. 8 वर्षे मंत्री आहेत.  तरी या मतदार संघात त्यांनी काही केलं नाही. असा आरोप राजन तेली यांनी केला आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी मागणी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना केल्याची माहीती राजन तेली यांनी दिली.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?

राजन तेलींच्या या टिकेला दीपक केसरकर यांनी ही सडेतोड उत्तर दिले आहे. दीपक केसरकारानी राजन तेलींच्या टिकेला उत्तर देताना त्यांना चिमटे काढले आहेत. सावंतवाडी मतदारसंघाचे पूर्वी काय चित्र होतं? हे त्यांना माहीती नसेल. आज चांगला दिवस आहे. कशाला कोणाचं नाव घेता, असं म्हणत सर्व सामान्य लोकांशी त्यांना काही देणघेण नाही. त्यांचं लक्ष दुसरी कडे आहे, असा टोला राजन तेलींचं नाव न घेता केसरकर यांनी लगावला आहे. फक्त मी केलेल्या कामाच्या ठीकाणी नारळ फोडणे येवढच काम राजन तेलींनी केलं आहे असंही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?

सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दीपक केसरकर यांची चांगली ताकद आहे. त्यांना आव्हान निर्माण करू शकेल असा नेता सध्या तरी मतदार संघात नाही. मात्र गेल्या दहा वर्षापासून राजन तेली यांनी सावंतवाडीत आपला जनसंपर्क वाढवला आहे. ते सतत सावंतवाडीत असतात. गेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढत जवळपास 56 हजार मते मिळवली होती. त्यांचा 13 हजार 228 मतांनी पराभव झाला होता. तर केसरकर हे सलग तीन वेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. एकदा ते राष्ट्रवादीकडून आमदार झाले होते. तर दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी भाजपच्या नारायण राणे यांना मताधिक्य मिळवून दिलं होतं. यावेळी तेली पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे केसरकर विरूद्ध तेली असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे.  

Advertisement