जाहिरात

Political news: धुळ्यातला काँग्रेसचा बडानेता भाजपच्या गळाला? उत्तर महाराष्ट्रात पक्षाला खिंडार पडणार?

काँग्रेसच्या बड्या नेत्याला आपल्या गोटात घेण्याचे जोरदार प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तसे झाल्यास धुळे काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Political news: धुळ्यातला काँग्रेसचा बडानेता भाजपच्या गळाला? उत्तर महाराष्ट्रात पक्षाला खिंडार पडणार?
धुळे:

भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे बडे नेते आपल्या गळाला लावण्यास सुरूवात केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात आता आणखी एका बड्या नेत्याची भर पडणार आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तसं झाल्यास काँग्रेससाठी तो मोठा धक्का असेल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं भाजपने आपलं 'धक्का तंत्र' आणखी तीव्र केलं आहे. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच रणनीतीचा एक भाग म्हणून, कुणाल पाटील यांनाही आपल्या गोटात घेण्याचे जोरदार प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तसे झाल्यास धुळे काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Congress

Congress

ट्रेंडिंग बातमी - Praniti Shinde:'खासदार प्रणिती शिंदेंना चपलेने मारा, पळवून लावा' वादग्रस्त वक्तव्य करणारा नेता कोण?

धुळे ग्रामीणचे माजी आमदार तथा राज्याचे काँग्रेस कार्याध्यक्ष असलेले कुणाल पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांच्यासोबत गुप्त भेट घेतली असल्याचे समजते. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात होण्याची तयारी आहे. कुणाल पाटील यांची धुळे ग्रामिणमध्ये मोठी ताकद आहे. कुणाल पाटील यांचे घराणे हे काँग्रेसचे एकनिष्ठ घराणे समजले जाते.  

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिग बातमी - Crime News: 50 वर्षाचा शिक्षक, 17 वर्षांची विद्यार्थीनी, 1 वर्षापासून अत्याचार अन् शेवटी...

माजी आमदार कुणाल पाटील यांचा धुळे जिल्ह्यातील तरुण आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून दबदबा आहे. त्यांच्या संभाव्य पक्षांतराने काँग्रेसला धुळ्यात मोठा धक्का बसू शकतो, तर भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील हे कट्टर काँग्रेसी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवलं होतं. त्यांनी अनेक खात्याची जबाबदारीही स्विकारली होती. गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून त्यांची ओळख आहे. राहुल गांधी धुळ्यात आल्यानंतर त्यांनी आवर्जून रोहिदास पाटील यांची भेट घेतली होती.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com