मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या नेत्याची दिल्लीत भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रामराजे शिंदे, प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच काँग्रेसचा बडा नेता भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा नेता पक्षामध्ये नाराज असल्यानं भाजपामध्ये लवकरच प्रवेश करु शकतो, अशी माहिती सूत्रांनी 'NDTV मराठी' ला दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या नेत्याची दिल्लीत भेट झाली. या भेटीत पक्ष प्रवेशावरुन खलबतं झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. या नाराजीतूनच काँग्रेसचा बडा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला मोठं महत्त्व असेल, असं मानलं जात आहे.