'मी नक्कीच मुख्यमंत्री होणार' दावा कोणाचा? प्रतिक्रिया काय आली?

सध्या आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. यामुळे मुख्यमंत्री नक्की कोण होणार याबाबत जनतेत संभ्रम आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
भंडारा:

राज्यात विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सध्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र असं असलं तरी सध्या आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. यामुळे मुख्यमंत्री नक्की कोण होणार याबाबत जनतेत संभ्रम आहेत. त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. मी नक्कीच मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर काँग्रेसमधल्या इच्छुकही यामुळे धावपळ उडाली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सध्या भंडाऱ्यात नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल असा वाद पेटला आहे. त्यांच्यात चांगली जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. नाना पटोले यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला जात आहे. यावर पटेल यांनी भावी हे भावीच राहणार असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. मी मुख्यमंत्री होणारच असं पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना ठणकावून सांगितलं आहे. पटोले यांनी पटेलांना प्रत्युत्तर देण्याच्या नादात आघाडीत मात्र चलबिचल निर्माण झाली आहे.  

ट्रेंडिंग बातमी - महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले

भंडारा जिल्ह्यात बुधवारी प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता "भावी हे भावीच राहतील", असं वक्तव्य केलं होत. त्यावर नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना उत्तर दिलं आहे. "मला आमदार होऊ देत नव्हते. पण आमदार झालो, खासदार होऊ देत नव्हते खासदार झालो, विधानसभा अध्यक्ष सुध्दा झालो आणि आता मुख्यमंत्री होणारच" असं वक्तव्य नाना पटोले यांनी भंडारा येथे केलं आहे. माझ्या नशिबात जे असेल ते होईल. हायकमांडचा आदेश असेल तर होईल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण योजना भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी' सरकारला थेट नोटीस

त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मात्र भूवया उंचावल्या आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवरा यांनी तर पटोले यांच्या वक्तव्यापासून हात झाडले आहेत. याबाबत आपल्याला काही माहित नाही असे ते म्हणाले. काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.तर आघाडीत उद्धव ठाकरे यांची ही इच्छा लपून राहीलेली नाही. राष्ट्रवादीतही जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची नावे घेतली जात आहेत. एकीकडे निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवू असे बोलले जात आहे. अशा वेळी नेते मात्र मुख्यमंत्री होणारच अशी विधानं करत आहेत. त्यामुळे आघाडीत तणावाचं वातावरण निर्माण होत आहे.