बच्चू कडू या ना त्या कारणाने सतत वादात असतात. आत त्यांच्या मागे नवा वाद लागला आहे. त्यात त्याच्या पत्नीला त्यांनी दबाव टाकून शिव भोजन केंद्राचे कंत्राट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऐवढेच नाही तर त्याबाबतची तक्रार थेट विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. चांदूरबाजार येथील माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी ही तक्रार केली आहे. शिवाय कडू यांचे बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नक्की प्रकरण काय?
बच्चू कडूंच्या पत्नीच्या संस्थेला शिवभोजन केंद्राचे कंत्राट देण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी पदाचा गैरवापर करत पत्नीच्या संस्थेला शिवभोजन केंद्राचे कंत्राट दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी चांदूरबाजार येथील माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी विधानसभा अध्यक्षांकडून केली आहे. ही बाब नियमाचे उल्लंघन करणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते. त्यात सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेस शिव भोजन केंद्र मंजूर करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार चांदूरबाजारच्या तहसीलदाराकडून या संस्थेला केंद्र देण्यात आले होते.
ट्रेंडिंग बातमी - भाजपकडे 100 जागा मागा, एकनाथ शिंदेंसमोर रामदास कदमांची मागणी
ते केंद्र बच्चू कडूंच्या पत्नीचे
ज्या संस्थेला केंद्र मंजूर करण्यात आले आहे, त्या संस्थेचे अध्यक्ष नयना कडू या आहेत. नयना कडू या बच्चू कडू यांच्या पत्नी आहेत. तर या संस्थेचे सचिव त्यांचे मेहुणे राहुल म्हाला आहेत. विधानसभा सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस शासनाच्या योजनेचा लाभ किंवा शासनाचे कंत्राट दिल्यास ते लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन समजले जाते. असे माजी नगरसेवक गोपाल तीरमारे यांचे म्हणणे आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'मिंदे आणि भाजपला सांगतो षंढ नसाल तर....' उद्धव ठाकरे यांचं थेट चॅलेंज
कडूंची आरोप फेटाळले
शिव भोजन केंद्र सरकारी नियम डावलून देण्यात आले आहेत. त्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी दबावही टाकला असा आरोप होत आहे. दरम्यान मंजूर झालेले शिवभोजन केंद्र हे अतिक्रमण केलेल्या जागेत असल्याचा दावाही तिरमारे यांनी केला आहे. तर हे सर्व आरोप बच्चू कडू यांनी फेटाळून लावले आहेत. शिव भोजन केंद्र हे बहुउद्देशीय संस्थेला देण्यात काही चुकीचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. उलट सर्व नियम पाळून शिवभोजन केंद्र सुरू केल्याचा दावा त्यांनी केला. या केंद्रातून त्या ठिकाणाहून 700 लोकांना शासकीय दराने जेवन दिले जात आहे. गोपाल तिरमारे यांचे आरोप हे रवी राणा यांच्या सांगण्यावरून प्रेरित झालेले आहेत, असे बच्चू कडू यांनी स्पष्ठ केले आहे.