'ज्यांना खुमखुमी आहे त्यांनी आधी...' फडणवीसांनी प्रवक्त्यांना खडसावले

जर बोलण्याची खुमखुमी असेल तर मग आधी तुमच्या नेत्याला सांगा. मला बोलायची खुमखुमी आहे. त्यांनी सांगितले बोला की मग बोलून तुमची खुमखुमी भागवा अशा शब्दात फडणवीसांनी प्रवक्त्यांचे कान टोचले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना चांगलेच खडसावले. सरकार चांगले काम करत आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी संवाददाता बनले पाहीजे. सरकारचे काम लोकापर्यंत पोहचवले पाहीजे. पण सध्या महायुतीत काही वेळा विसंवाद दिसतोय. महायुतीचे प्रवक्ते एकमेकांच्या विरोधात बोलत असतात. सर्वात आधी हे बंद करा. जर बोलण्याची खुमखुमी असेल तर मग आधी तुमच्या नेत्याला सांगा. मला बोलायची खुमखुमी आहे. त्यांनी सांगितले बोला की मग बोलून तुमची खुमखुमी भागवा अशा शब्दात फडणवीसांनी प्रवक्त्यांचे कान टोचले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

फडणवीसांनी कान टोचले 

महायुतीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसहे तीन पक्ष आहेत. पण या तीन पक्षात समन्वय नाही असे फडणवीस जाहीर पणे म्हणाले.एकमेका विरोधात बोलणे टाळा. पण तसे होताना दिसत नाही. आपण जर एकमेका विरोधात बोलणार असू तर मग बाहेर काय संदेश जाईल याचा विचार करा असेही फडणवीस म्हणाले. विरोधात बोलणे बंद करा. तुम्ही संवाददाता बना. सरकारची कामे लोकांपर्यंत पोहचला. नसत्या भानगडीत पडू नका. बोलण्यचा खुमखुमी असेल तर पक्षाच्या नेत्या बरोबर बोला. त्यानंतरच जाहीर पणे बोला असा सल्ला फडणवीस यांनी दिला. काही वाद असतील तर ते चार भिंतीत सोडवा. त्याचे प्रदर्शन जाहीर पणे मांडू नका असेही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - फैसला होणार? धनुष्यबाण कोणाला मिळणार? घड्याळाची टिकटिक बंद होणार?

'हिट विकेट होवू नका' 

महायुतीत वाद असल्याचे नरेटिव्ह सध्या पसरवले जात आहे. हा आपल्यासाठी रचला गेलेला ट्रॅप आहे.  त्या ट्रॅपमध्ये अडकू नका. आपल्यात एकी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.त्यामुळे त्यात तुम्ही तुमची हीट विकेट देवू नका असेही यावेळी फडणवीस म्हणाले. सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. विरोधकांना आपल्यात फुट पाडायची आहे. त्यांच्या डावपेचांना बळी पडलात तर आपलाच शेखचिल्ली होईल असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ‘इलेक्शनमग्न' महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का? शहाजीराजांच्या समाधीची अवस्था काय?

युतीत तडजोड करावी लागते 

सध्या आपण महायुतीत आहोत. त्यामुळे जागावाटप योग्य पद्धतीने केले जाईल. युती म्हटली की तडजोड करावीच लागते असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसे केले नाही तर युती टिकणार नाही. एखाद्याला उमेदवारी मिळाली तर दुसरा मी माझं बघून घेतो ही गोष्टी चालणार नाही. असे झाल्यास आपला घात होईल हे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. विरोधक लोकसभेतील विजयाने हुरळून गेले आहेत. त्यामुळे तो कोणत्याही पद्धतीच्या तडजोडीसाठी तयार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सर्वांनीच विचार करावा असेही ते यावेळी म्हणाले. 

Advertisement
Topics mentioned in this article