जाहिरात

‘इलेक्शनमग्न’ महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का? शहाजीराजांच्या समाधीची अवस्था काय?

राजकीय नेते पुढारी निवडणुकीच्या तयारीत मग्न आहेत. शिवाजी महाराजांच्या नाववर मत मागण्यासाठीही त्यांची तयारी आहे. पण त्यांच्या पित्याच्या समाधीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही.

‘इलेक्शनमग्न’ महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का? शहाजीराजांच्या समाधीची अवस्था काय?
मुंबई:

अरबी समुद्रात करोडो रूपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. पण अजूनही त्या स्मारकाचे काही झाले नाही. तर दुसरीकडे छत्रपतींचे पिता शहाजीराजे यांच्या समाधीची दुरावस्था झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. राजकीय नेते पुढारी निवडणुकीच्या तयारीत मग्न आहेत. महाराजांच्या नाववर मत मागण्यासाठीही त्यांची तयारी आहे. पण त्यांच्या पित्याच्या समाधीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. त्यामुळे 'इलेक्शनबाज स्वार्थी  महाराष्ट्रा जागा हो ,निदान आपल्या पित्याच्या महापित्यासाठी तरी !'अशी आर्तहाक इतिहासकार विश्वास पाटील यांनी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शहाजे राजे यांची समाधी कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यात होदीगीरे या गावात आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीची समाधी असावी अशा अवस्थेत ही समाधी सध्या आहे. ना उन्हा पासून संरक्षण ना पावसासाठी आडोसा अशी स्थिती या समाधीची आहे. 360 वर्षांपूर्वी याच ठिकाणी शिवरायांचे पिता शहाजीराजांची घोड्यावरून पडून अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांची या ठिकाणी समाधी बांधण्यात आली. मात्र त्या समाधीकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. 

Latest and Breaking News on NDTV

 ट्रेंडिंग बातमी - 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या,तेही शिवरायांसारख्या महापुरुषाच्या जन्मदात्याच्या समाधीकडे महाराष्ट्राने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, असा आरोप इतिहासकार विश्वास पाटील यांनी केला आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांच्या वडिलांची कोटी कोटी रुपयांची स्मारके सरकारी खर्चाने या महाराष्ट्रभूमीत बांधली गेली.मात्र शहाजीराजांच्या नशिबी हे असे काय यावे असा प्रश्न पाटील यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - वजन कमी करण्यासाठी काय कराल? 'या' फळाचं करा सेवन 

ज्यांनी शिवरायांना जन्म दिला.“गनिमी  काव्या” ची दीक्षा दिली. बेंगलोरच्या किल्ल्यात  शिवरायाना  लष्करी शिक्षण दिले. स्वतः ज्यानी ती शिवरायांची सुप्रसिद्ध “राजमुद्रा” लिहिली त्या शहाजीराजांच्या नशिबी हे काय आले आहे. औरंगजेबाचा आजोबा जहांगीर याच्या फौजांच्या विरोधात 1624 ची भातवडीची लढाई शहाजी राजांनीच जिंकली होती. औरंगजेबाच्या बापाच्या फौजांना  इतके सळो की  पळो  करून सोडले की, त्याला ताजमहालचे बांधकाम बाजूला ठेवून  1634 मध्ये शहाजी राजेंच्या विरोधात स्वतः लढाईसाठी महाराष्ट्रात यायला भाग पाड पाडलं होतं.

Latest and Breaking News on NDTV

नियमांचे पालन करा...पळून जाऊ नका! पुण्यातल्या बिल्डरपुत्रानं 2 महिन्यांनी लिहिला 300 शब्दांचा निबंध)

“ज्या भूमीत शहाजी राजे राहतात, तिथल्या पहाडाना आपोआप पाय फुटतात”असे अनुमान काढण्यात आले होते. शिवाय दिल्लीचा बादशहा शहाजहानने 31 मे 1635 च्या माहुलीच्या कराराच्या तिसऱ्या कलमानुसार शहाजीराजांना महाराष्ट्रातून  हद्दपार केले होते. म्हणून त्यांना दीर्घकाळ कर्नाटकात राहावे लागले होते हा इतिहास आहे. असा महान योद्धा महान पित्याची समाधी कर्नाटकात गेली 360 वर्षा पासून वैराण माळावर आहे. “फक्त निवडणुका लढवण्याची आणि जिंकण्याची चटक हेच जीवनध्येय” मानलेला आजचा महाराष्ट्र दुर्दैवाने आपला खरा इतिहास, संस्कृती आणि माणुसकीही विसरून चालला आहे असे पाटील यांनी म्हटले आहे. “दुश्मनांच्याही स्मृतीस्थळांकडं आदराने पहा” असं सांगणाऱ्या शिवरायांच्या जन्मदात्याच्या स्मृतीस्थळाची ही अशी दुर्दैवी अवस्था पाहून काळजाला चटके बसतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता तरी त्याकडे लक्ष देईल का असा प्रश्न आहे. 

तीन वर्षामागे  हा विषय महाराष्ट्र सरकार समोर मांडल्याचेही विश्वास पाटील यांनी सांगितले. पण प्रश्न आमच्या शिवरायांच्या पित्याचा असतानाही मेलेल्या महाराष्ट्राने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही असा आरोपही पाटील यांनी केला आहे. कर्नाटकातली सामान्य माणसे कशीबशी या समाधीची देखरेख करत आहेत. असेही ते म्हणाले. 

Previous Article
छत्तीसगडमध्ये 36 नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठं यश
‘इलेक्शनमग्न’ महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का? शहाजीराजांच्या समाधीची अवस्था काय?
ic-814-kandahar-hijacking-web-series-anubhav-sinha-says-terrorists-were-playing-antakshari-with-passengers-apologised-to-the-pilot-and-hugged-him
Next Article
IC 814 Hijack : प्रवाशांसोबत अंताक्षरी ते दहशतवाद्याकडून माफी, अनुभव सिन्हाच्या वेब सीरिजमध्ये काय आहे?