
राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील पदविका (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत 1 लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली आहे.यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता यामध्ये मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. त्याला आत सरकारने ही प्रतिसाद दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू नये म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे पॉलीटेक्निकला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शिवाय जास्तीत जास्त विद्यार्थी आता अर्ज सादर करू शकतील.
या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत, आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होवू शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world