मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विजयाचा रथ रोखणार? दीपेश म्हात्रेंची प्लॅनिंग काय?

डोंबिवलीतील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. इथं विद्यमान आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचं प्राबल्य आहे. भाजपचा हा गड मानला जातो.

जाहिरात
Read Time: 3 mins
डोंबिवली:

भाग्यश्री प्रधान आचार्य 

दीपेश म्हात्रे यांनी नुकतीच शिंदे गटाला सोड चिठ्ठी देत थेट मशाल हाती धरली. त्यांच्या या प्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. इथं विद्यमान आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचं प्राबल्य आहे. भाजपचा हा गड मानला जातो. मात्र इथं शिवसेनेची ही तेवढीच साथ भाजपला मिळाली आहे. त्यात दीपेश म्हात्रे यांनी शिंदेंची साथ सोडत ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. त्यांची ही डोंबिवलीत मोठी ताकद आहे. त्यामुळे आमदार रवींद्र चव्हाण यांना म्हात्रे यांचं कडव आव्हान मिळेल अशी चर्चा सध्या होत आहे.  डोंबिवलीमध्ये सध्या रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात संघात नाराजीचे वातावरण आहे. त्यात राहुल दामले, मंदार हळबे हे भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र रविंद्र चव्हाण हे थेट पक्षश्रेष्ठींच्याच संपर्कात असल्याने त्यांची उमेदवारी ही निश्चित मानली जाते. शिवाय ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचेही मानले जातात. त्यामुळे कितीही नाराजी असली तरी रविंद्र चव्हाण यांच्या शिवाय भाजपला पर्याय नाही अशी सध्याची स्थिती आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाचा झेंडा उचलणारे दीपेश म्हात्रे शिवसेनेकडून आमदरकीचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. त्यादृष्टीने ते डोंबिवलीत कामाला ही लागले होते. मात्र रविंद्र चव्हाण यांना डावलून म्हात्रे यांना तिकीट देणे शिंदेंना शक्य नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर दीपेश यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. त्या आधी ते चव्हाण यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. त्यातून त्यांनी चव्हाण यांच्यावर वेगवेगळ आरोपही केले. 

ट्रेंडिंग बातमी -  Election Results 2024 LIVE: आज हरियाणा, जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल, भाजप की काँग्रेस कोणाचा विजय?

म्हात्रे यांच्या मागे मोठ्या प्रमाणात आग्री समाज आहे. सर्व पक्षातील आग्री समाजातील नेत्यां बरोबर त्यांचे चांगले संबध आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपचे विकास म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, शिवसेनेचे रमेश म्हात्रे या सर्वांनाच एकाच मंचावर आणले होते. मतदार संघात म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या विरोधात भूमीका घेतली. याची तक्रार चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कानावर घातली. त्यानंतर दीपेश म्हात्रे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे वर्षावर बोलवून त्यांना तंबी दिल्याची बातमी समोर आली. त्यांची सुरक्षा ही काढून घेण्यात आली. त्यांना काही बाबतीत नोटीसाही पाठवण्यात आल्या. इतकेच नव्हे तर दीपेश म्हात्रे यांना पाठिंबा देणाऱ्या रमेश म्हात्रे यांना देखील तडीपारची नोटीस पाठवण्यात आली.

ट्रेंडिंग बातमी - प्रहारचे राजकुमार पटेल शिंदेंच्या सेनेत कसे गेले? मोठा गौप्यस्फोट

मंत्री रवींद्र चव्हाण हे गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळात एकदा राज्यमंत्री आणि आता सार्वजनिक मंत्री झाले आहेत. 2009 मध्ये रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मनसेचे राजेश कदम यांनी निवडणूक लढवली होती. जे आत्ता शिवसेनेत असून श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. 2014 मध्ये अखंड शिवसेनेत असलेल्या दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या समोर निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी म्हात्रे यांना चव्हाण यांच्या डोंबिवलीतील दांडग्या संपर्कामुळे पराभव स्वीकारावा लागला होता. तर त्यानंतर कट्टर संघाचे कार्यकर्ते असलेले मात्र काही काळ मनसेत गेलेले मंदार हळबे यांनी त्यांना कडव आव्हान दिलं. मात्र रवींद्र चव्हाण निवडून आले. असे असले तरी सध्या संघाच्या लोकांनाही बदल हवा असल्याची चर्चा डोंबिवलीत रंगली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - गरबा खेळत असताना भोवळ आली, खाली कोसळला, पुण्यामध्ये भयंकर घडलं

असं असलं तरी जगन्नाथ पाटील यांच्यानंतर आगरी व्यक्तीला डोंबिवलीचं प्रतिनिधीत्व करता आलेलं नाही. याची रुखरुख आगरी समाजाला कुठेतरी  आहे. त्यामुळे जर डोंबिवलीतील आगरी समाज एकत्र आला तर रवींद्र चव्हाण यांना दीपेश म्हात्रे यांचं आव्हान कडव ठरू शकतं. त्यातच दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे यांचं ठाणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पूर्वीपासून नाव आहे. त्यामुळे कमळ मशालीच कडव आव्हान कसं पेलणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.