सध्या नवरात्रौत्सवाची धुम सर्वत्र सुरू आहे. दांडिया ही सध्या सर्वत्र खेळला जात आहे. मोठ्या संख्येने गरबा दांडिया उत्सवामध्ये लोक सहभागी होत आहेत. पण दांडिया खेळताना पुण्याच्या चाकणमध्ये एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. चाकणमध्ये अशोक माळी हे दांडिया खेळत होते. त्यांच्या आजूबाजूला लहान मुलही दांडिया खेळत होते. त्याच वेळी त्यांना भोवळ आली. ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गरबा खेळत असताना एकाला अचानकपणे भोवळ आली. काही वेळातच त्याचा मृत्यू ही झाला. हार्ट अटॅक येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुण्याच्या चाकण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत अशोक माळी या गरबा डान्सरचा हार्ट अटॅक येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशोक माळी हा चाकण परिसरामध्ये लहान मुलांसोबत गरबा डान्स करत असताना त्याला अचानक भोवळ आली. तो खाली कोसळला. त्यांनतर अगदी काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकमुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या आधीही अशीच घटना घडली होती. दरम्यान हा घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यात अशोक माळी हे दांडिया खेळत असताना दिसत आहे. ज्या सहजतेने ते दांडिया खेळत आहेत हे पाहिले असता पुढे असं काही भयंकर होईल याची कल्पनाच कोणी केलेली नसेल. पण नाचता नाचता अचानक ते खाली कोसळतात आणि तेथेच बेशुद्ध होतात. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world