Delhi Assembly Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं आहे. तब्बल दोन दशकांनंतर भाजपने दिल्लीत सत्तावापसी केली आहे. भाजपला आपच्या तुलनेत (Delhi Assembly BJP Vote Share) अत्यंत कमी जागा मिळाल्या असल्या तरीही वोट शेअरमध्ये अवघ्ये दोन टक्क्यांचं अंतर आहे. म्हणजेच वोट शेअरमधील अवघ्या दोन टक्क्यांच्या फरकाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने 40 हून (AAP Vote Share) जास्त जागा जिंकल्या.
मायक्रोमॅनेजमेंटमध्ये भाजप विरोधींपेक्षांही पुढे...
दिल्ली चुनाव
गेल्या विधानसभेत मतटक्का किती होता?
2020 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला 53.57 टक्के मतदान झालं होतं आणि त्यांनी 62 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला अवघे 38.51 टक्के मतं मिळाली होती आणि 8 जागा जिंकता आल्या होत्या. यानुसार भाजपचा मतटक्का यंदा अवघ्या 8 टक्क्यांती वाढला तर आपचा 10 टक्क्यांनी कमी झाला आहे