जाहिरात

Delhi Result 2025 : भाजप -आपच्या वोट शेअरमध्ये 2% तर जागांमध्ये तब्बल 40 चं अंतर, दिल्ली निवडणुकीमध्ये ही ठरली मोठी खेळी!

भाजपला आपच्या तुलनेत (Delhi Assembly BJP Vote Share) अत्यंत कमी जागा मिळाल्या असल्या तरीही वोट शेअरमध्ये अवघ्ये दोन टक्क्यांचं अंतर आहे.

Delhi Result 2025 : भाजप -आपच्या वोट शेअरमध्ये 2% तर जागांमध्ये तब्बल 40 चं अंतर, दिल्ली निवडणुकीमध्ये ही ठरली मोठी खेळी!

Delhi Assembly Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं आहे. तब्बल दोन दशकांनंतर भाजपने दिल्लीत सत्तावापसी केली आहे. भाजपला आपच्या तुलनेत (Delhi Assembly BJP Vote Share) अत्यंत कमी जागा मिळाल्या असल्या तरीही वोट शेअरमध्ये अवघ्ये दोन टक्क्यांचं अंतर आहे. म्हणजेच वोट शेअरमधील अवघ्या दोन टक्क्यांच्या फरकाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने 40 हून (AAP Vote Share) जास्त जागा जिंकल्या. 

मायक्रोमॅनेजमेंटमध्ये भाजप विरोधींपेक्षांही पुढे...

मायक्रोमॅनेजमेंटमध्ये भाजप आपल्या विरोधी पक्षापेक्षा खूप पुढे निघून गेली आहे. काँग्रेसचा मतटक्काही गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढला आहे. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसला याचा फारसा फायदा झालेला नाही. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात भाजपला 45.56 टक्के आणि आपला 43.57 टक्के मतं मिळाली आहे. मतदारसंघांमध्ये भाजप 48 पर्यंत पोहोचली आहे. तर दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आपल्या खात्यात केवळ 22 जागा आल्या आहेत. 
दिल्ली चुनाव

दिल्ली चुनाव

गेल्या विधानसभेत मतटक्का किती होता?
2020 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला 53.57 टक्के मतदान झालं होतं आणि त्यांनी 62 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला अवघे 38.51 टक्के मतं मिळाली होती आणि 8 जागा जिंकता आल्या होत्या. यानुसार भाजपचा मतटक्का यंदा अवघ्या 8 टक्क्यांती वाढला तर आपचा 10 टक्क्यांनी कमी झाला आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: