Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर

छगन भुजबळ यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? मुंडे सध्या कुठे आहेत? हे प्रश्न विचारले जात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यात मागच्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार मोठ्या बहुमतासह सत्तेवर आलं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाले. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर लगेच त्यांचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यामुळे अडचणीत सापडलं होतं. 

बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर आणि इतर विविध कारणांमुळे वादात सापडलेल्या धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच आठ दिवसापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.  धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मंत्रिपद जाताच धनंजय मुंडे हे सार्वजनिक ठिकाणी फारसे सक्रीय दिसले नाहीत. अगदी बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या एका दौऱ्यातही ते अनुपस्थित होते. प्रकृतीचं कारण देत आपण अनुपस्थित राहिलो असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. प्रकृती बरी नसल्याचं कारण त्यांनी यावेळी दिलं.

छगन भुजबळ यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? मुंडे सध्या कुठे आहेत? हे प्रश्न विचारले जात आहेत. काही दिवसांपूर्वी  बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे अपघाती निधन झाले. देशमुख हेही मुंडे कुटुंबाचे अतिशय जवळचे होते. तरीही देशमुख यांच्या अंत्यसंस्कारात धनंजय मुंडे अनुपस्थित होते. त्यामुळे मुंडे सध्या कारतात? ही चर्चा आणखी सुरु झाली होती. 

Advertisement

( नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video )

धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिकच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  आठ दिवसापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली ही घटना घडताच धनंजय मुंडे यांनी तातडीने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे असलेले विपश्यना केंद्र गाठले.

आठ दिवसापासून ते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून  सांगण्यात आले  

सलग दहा दिवस त्यांचा हा कार्यक्रम असल्याचे समजते त्यापैकी आठ दिवस पूर्ण झाले असून ते आपली धारणा साधना पूर्ण करून दोन तारखेला पुन्हा कामाला लागणार असल्याचे त्यांचे कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

Advertisement

वेगवेगळे वाद, आरोप, शपथविधी राजीनामा अशा वेगवेगळ्या घटनांमुळे धनंजय मुंडे हे मागील सहा महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत.  ते काही दिवसांपूर्वी उपचारासाठी विदेशात गेल्याची ही माहिती आली होती. आता विपशनेनंतर नवीन धनंजय मुंडे पाहायला मिळतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 
 

Topics mentioned in this article