शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli Mayor And Deputy Mayor News : सांगली महापालिकामध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची सत्ता स्थापन होणार असल्याचं निश्चित झालंय. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे.तसेच त्यांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या नावांची देखील घोषणा केली आहे. भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गजानन मगदूम यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम याची बिनविरोध निवड झाली आहे.
सांगली महापालिकेत भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात युती झाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. अशातच काँग्रेसकडून महापौर उपमहापौर पदासाठी कोणाचाही अर्ज न आल्याने सांगली महापालिकेत धीरज सूर्यवंशी महापौरपदी आणि उपमहापौरपदी गजानन मगदूम बिनविरोध झाले आहेत. आता 10 फेब्रुवारीला विशेष महासभेत निवडीची औपचारिकता बाकी आहे.
नक्की वाचा >> Dombivali News: डोंबिवलीत मनसेची 'एकता', शोरमा स्टॉल सुरु झाल्यावर एकता सावंत म्हणाली, "राज साहेबांनी.."
78 पैकी भाजपने 39 नगरसवेकांपर्यंत मजल मारली
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत 78 पैकी भाजपने 39 नगरसवेकांपर्यंत मजल मारली तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 3 आणि अजित पवार गटाचे 16,तसच काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी महायुती झाली नव्हती. अजित पवार गट राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांविरोधात लढत होते. या निवडणुकीनंतर महापौर नेमका कोणाचा होणार? याबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.
कारण शिंदे गटाचे 2 उमेदवार,इतर आणि भाजपमधील काही नगरसेवक मिळून सत्ता स्थापन होईल का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. महापौर कोणाचा होणार याबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरू होत्या,सांगली मिरज कुपवाड महापालिकेत अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता नव्हती. पण अजित पवार यांचे निधन होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सांगली महापालिका मध्ये युतीबद्दल चर्चा झाली होती.त्याआधी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि अजित दादा पवार यांच्यात चर्चा झाली होती.