जाहिरात

Dombivali News: डोंबिवलीत मनसेची 'एकता', शोरमा स्टॉल सुरु झाल्यावर एकता सावंत म्हणाली, "राज साहेबांनी.."

मनसेनं पुढाकार घेऊन एकता सावंतचा शोरमा स्टॉल सुरु केला असून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत यांच्याहस्ते या स्टॉलचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर एकता सावंतने मोठी प्रतिक्रिया दिलीय.

Dombivali News: डोंबिवलीत मनसेची 'एकता', शोरमा स्टॉल सुरु झाल्यावर एकता सावंत म्हणाली, "राज साहेबांनी.."
Ekta Sawant Shorma Stall News
मुंबई:

Ekta Sawant Dombivali Shorma Stall News : डोंबिवली स्टेशन परिसरात कल्याण-डोंबिवली महापालिकेने मराठी तरुणी एकता सावंतच्या शोरमा फूड स्टॉलवर करावाई करुन तो बंद केला होता. त्यानंतर या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली होती.त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत एकता सावंतच्या शोरमा स्टॉलची पाहणी केली होती. महापालिकेचे कर्मचारी तिच्याकडून हफ्ता घ्यायचे आणि तिला नाहक त्रास द्यायचे, असा आरोप एकताने त्यावेळी केला होता. मनसेनं पुढाकार घेऊन एकता सावंतचा शोरमा स्टॉल सुरु केला असून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत यांच्याहस्ते या स्टॉलचा शुभारंभ करण्यात आला. 

काय म्हणाली एकता सावंत?

"अविनाश दादांनी मला खूप मदत केली आहे.त्यांच्यामुळेच नवीन गाडी (स्टॉल)उभी आहे. मी जेव्हा गाडी वापरत होती, ती भाड्याने वापरत होती. दादांनी मला खूप मदत केलीय आणि दुसरी गोष्ट दादांनी मला खूप हिंमत दिलीय की तू करू शकतेस. त्यांचं असं म्हणणं आहे की, मराठी लोकांनी बिझिनेस करावा. मराठी मुलांनी बिझिनेस करावा, यासाठी मी पैसा लावतो.तुम्ही बिझिनेस करा.त्यांनी आज ते खरंच करून दाखवलं. राज साहेबांनी एकदा इथे भेट द्यावी. ते थोडे बिझी आहे, असं दादा म्हणाले. पण जेव्हा ते इथे येतील खूप आनंद होईल",असं एकता सावंतने माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मोबाईलचं वेड! गाझियाबादच्या तीन बहिणींसारखं 'या' विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, कोणती गेम खेळायचा? पालक म्हणाले..

काही दिवसांपूर्वी डोंबिवली स्टेसन परिसरात एकताच्या शोरमा विक्रीचा स्टॉलवर महापालिकेने कारवाई केली होती. मराठी तरुणीला स्टॉल चालवू दिला जात नाही.स्टॉलवर महापालिका कारवाई करते आणि काही लोक तिच्याकडून 300 रुपयांचा हप्ता घेत होते. परप्रांतीय फेरीवाले आणि व्यावसायिकांना व्यवसाय करुन दिला जातो. पण मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई केली जाते.हा मुद्दा उपस्थित करत एकता सावंतने व्हिडीओ व्हायरल करत तिची व्यथा मांडली होती.  

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या प्रकाराची दखल राज ठाकरे यांनी घेतली. या पकरणाबाबत अविनाश जाधव म्हणाले, "रेल्वे स्थानकातील परिसर पादचारी आणि नागरिकांसाठी मोकळा असावा. 150 मीटरच्या अंतरात फेरीवाले बसले नाही पाहिजेत".मनसेने 2017 मध्ये यासंबधीत प्रकरणांबाबत आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. यासंदर्भात महापालिका,पोलीस,रेल्वे पोलीस,रेल्वे प्रशासनाने न्यायालयात दाद मागितली होती. परंतु, या प्रकरणांबाबत परिस्थिती जैसे थेच आहे.  

नक्की वाचा >> गिरीश महाजनांनंतर पंकजा मुंडे वादात, बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला नाही, आंबेडकरी जनतेत संताप

पोलीस,रेल्वे पोलिस आणि रेल्वे याप्रकरणांबाबत कानाडोळा करत असल्याचं चित्र आहे. मराठी तरुणी सावंतचा स्टॉल हटवला गेला.तेव्हा मनसेने पाहणी केली. त्यावेळीच स्टेशन परिसरात 3500 पेक्षा जास्त फेरीवाले होते.दरम्यान, सावंतच्या स्टॉलवर महापालिकेने कारवाई केल्यास त्यांना जाब विचारला जाईल.  2017 ते 2026 पर्यंत महापालिकेने किती कारवाया केल्या, याची सविस्तर माहिती महापालिकेकडे मागितली जाईल, असं मनसे नेत्यांचं म्हणणं आहे. महापालिकेने कारवाई केल्यास मनसेकडून अशा कारवायांना विरोध केला जाईल, असाही इशारा मनसैनिकांनी दिला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com