खांदेपालट होणार? मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांवर नवी जबाबदारी?

नार्वेकर यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि किसन कथोरे यांची नाव देखील चर्चेत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सागर कुलकर्णी 

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून विद्यमान अध्यक्ष राहिलेले राहुल नार्वेकर यासह काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नावे समोर येत आहेत. नार्वेकर यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि किसन कथोरे यांची नाव देखील चर्चेत आहेत. त्यामुळे भाजप राहुल नार्वेकरांना संधी देणार की आपल्याच पक्षातल्या जेष्ठ नेत्याची यापदावर वर्णी लावणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राहुल नार्वेकर यांना परत विधानसभा अध्यक्ष होण्यात फारसा रस नाही. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवं आहे. मात्र मुंबईमधून जर मंगल प्रभात लोढा यांना कॅबिनेटपदी वर्णी लावायचे असेल तर नार्वेकरांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणं कठीण आहे. मुंबई उपनगरात देखील अनेक जण कॅबिनेट मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यात आशिष शेलार, अतुल भातकळकर, अमित साटम अशी मराठी नावं आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?

आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे उत्तर भारतीय तसचं इतर समाजातील लोकांना देखील संधी द्यावी लागणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईत मलबार हिल आणि कुलाबा असे आजूबाजूला लागून असलेल्या मतदारसंघात दोन कॅबिनेट मंत्रीपद देणे कठीण होणार आहे. मंगल प्रभात लोढा हे  मलबार हील मतदारसंघातून निवडून येतात. तर त्याला लागूनच असलेल्या कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. यामुळे दोघांनाही कॅबिनेट मंत्रिपद देणे कठीण असल्याचे म्हटले जाते.

ट्रेंडिंग बातमी - विरोधकांचा आमदारकीची शपथ घेण्यास नकार का? पहिल्याच दिवशी पेच

चंद्रकांत पाटील यांनी या आधी भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार अशी महत्त्वाची खाती पाहिली आहेत. गेल्या काही कालावधीमध्ये पाटील यांनी उच्च तंत्र शिक्षण तसेच पुणे पालकमंत्रीपद देखील सांभाळले आहे. आता पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांला प्रदेशाध्यक्ष ऐवजी विधानसभा अध्यक्षपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मुनगंटीवार हे पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. त्यांना कामकाजाची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता ते कॅबिनेटमध्ये असतील की नाही याची चर्चा आहे. मात्र त्यांचे पुनर्वसन म्हणून विधानसभा अध्यक्षपदावर त्यांची नियुक्त होवू शकते अशी चर्चा आहे. त्याच बरोबर किसन कथोरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. 

Advertisement