विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. त्यांनी आमदारपदाची शपथ घेण्यास नकार देत त्यावर बहिष्कार घातला. विद्यमान सरकारचा विजय हा खरा विजय नसून निवडणूक आयोगाला हाताशी धरून मिळवलेला हा विजय आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. लोकशाही चिरडण्याचे काम हे या सरकारने केले आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. जनतेमध्ये या विजयाबाबत आनंद नाही. जनतेच्या या भावनांचा विचार करत विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. तर विरोधकांनी उद्या शपथ घेतली नाही तर विधानसभेत येता येणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारांचा शपथविधी होता. मात्र या शपथविधीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. आदित्य ठाकरे यांनी जनतेचा मान राखून आम्ही शपथ घेणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात असेल. लोकशाही चिरडण्याचे काम 2014 पासून होत आहे. अनेक संस्था या उद्धवस्त केल्या जात आहेत. लोकसभेत जनतेने निकाल दिला. तोच निकाल विधानसभेत चिरडण्याचं काम केलं गेलं. त्याच निषेध करत आम्ही आमदारकीची शपथ घेणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - 'कुणी संस्कृतमध्ये तर कुणी अल्लाह साक्ष....,' 'या' आमदारांचा शपथविधी ठरला खास!
विधानसभेचे निकाल लागले. तेव्हा पासून राज्यातल्या जनतेच्या मनात खदखद आहे. असा निकाल कसा लागू शकतो. जनतेचा या निकालावर विश्वास बसत नाही. असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. मारकडवाडीनं बॅलेटवर मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोध का केला गेला. पोलिस का आणले गेले. तो तर गावाचा निर्णय होता. 74 लाख मतं शेवटच्या टप्प्यात कशी वाढवी. मतदानाची टक्केवारी ही अचानक वाढली. हा विजय म्हणजे निवडणूक आयोगाने करून दिलेली अरेंजमेंट असल्याचा आरोप आव्हाय यांनी केला. त्यामुळे आम्ही मारकडवाडीच्या समर्थनार्थ आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार टीका केली. महायुतीला मोठा विजय मिळाला. पण राज्यात जो जोष उत्साह दिसायला पाहिजे होता तो कुठेही दिसला नाही. महाराष्ट्रात शोककळा पसरल्या सारखे वातावरण आहे. जनतेत उत्साह दिसत नाही. याचा अर्थ डाल मे कुछ काला है. तर पुर्ण दालच काळी आहे असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळेच आजच्या दिवस आम्ही आमदारपदाची शपथ घेणार नाही. आम्ही त्यावर बहिष्कार टाकला आहे असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - मुंबई, कोल्हापूर ते बारामती.... अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त
दरम्यान विरोधकांनी आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे. त्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. जे आमदारकीची शपथ उद्या पर्यंत घेणार नाहीत, त्यांना विधानसभेत बसता येणार नाही असे अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावले आहे. त्यामुळे विरोध उद्या तरी शपथ घेणार की नाही याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांनी महायुतीच्या विजयाबाबत संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world