शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिलासा देणारा अहवाल मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केला. मात्र आता या अहवालावरून भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंना टोकलं आहे. पिक्चर अभी बाकी है असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोप राजकीय नसून ते एका वडिलांनी केलेले आरोप आहेत. ते कसे खोटे असू शकतील असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला आहे. त्यात आदित्य ठाकरे यांना दिलासा देण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर जे आरोप करण्यात आले ते सर्व या अहवालात फेटाळून लावण्यात आले आहेत. त्यामुळे एक प्रकारे आदित्य ठाकरेंना क्लिनचिट देण्यात आली आहे. त्यानंतर राजकारण ही तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर या प्रकरणी नितेश राणे यांनी माफी मागितली पाहीजे अशी मागणी केली.
ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यात मुंबईप्रमाणे लोकलसेवा सुरू होणार? विधानसभेत सरकारचं उत्तर काय?
नितेश राणे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना काही गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. SIT चा अहवाल 17 जूनला केलेल्या तपासावर आहे. कोर्टात काल गेलेल्या अहवालाबाबतची माहिती घ्यावी असं त्यांनी माध्यमांनाच सांगितलं. शिवाय या विषय नितेश राणेपूरता नाही. दिशा सालियानच्या वडिलांनीही अॅफिडेविट केलं आहे. हा राजकीय आरोप नाही. दिशा सालियानचे वडील जेआरोप करत आहेत, ते राजकिय आरोप करत आहेत का? पिचर अभी बाकी आहे असं ही ते म्हणाले.
या प्रकरणाची पुढील तारीख ही 16 आहे, तेxव्हा काय होतं ते बघू. आताचे सरकार काय अहवाल काय देतं ते बघू. आदीत्य ठाकरेंनी कोर्टात खोटी माहिती दिली आहे. असा थेट आरोप नितेश राणेंनी यावेळी केला आहे. दरम्यान दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या विरोधात पुरावा सापडला नसल्याचं पोलिसांनी अहवालात सादर केलं आहे. यावर आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे कि गेली 5 वर्ष माझी बदनामी करण्यात आली. तेव्हाही मी या आरोपांवर फार बोललो नाही, आता सुद्धा बोलणार नाही असं ते म्हणाले.