वक्फ बोर्ड वरून समिती सदस्यांमध्येच जुंपली, सेना-तृणमुलचे खासदार भिडले, नक्की कारण काय?

वक्फ बोर्ड संयुक्त संसदीय समितीच्या बैठका अगोदर दिल्लीत झाल्या. त्यानंतर आता पाच राज्यात बैठका आयोजित केल्या आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

रामराजे शिंदे

वक्फ बोर्ड विधेयकावर तयार केलेल्या संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत मोठी वादावादी समोर आलीय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांमध्ये वाद झाला आहे. वक्फ बोर्ड संयुक्त संसदीय समितीच्या बैठका अगोदर दिल्लीत झाल्या. त्यानंतर आता पाच राज्यात बैठका आयोजित केल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिलनाडु आणि कर्नाटक मध्ये 26 सप्टेंबर ते 1 ॲाक्टोबरपर्यंत हा दौरा आहे. मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बेंगलुरु मध्ये बैठका होणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

जेपीसी सदस्य या पाचही राज्यातील अल्पसंख्याक समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.  तसेच वक्फ विधेयक संदर्भात त्यांची भूमिका जाणून घेणार आहेत. मुंबईतील एका हॉटेलमध्ये वक्फ बोर्डावरील संयुक्त संसदीय समितीची बैठक सुरू होती. परंतु या बैठकीत पहिल्या सत्रातच वादाची ठिणगी पडली. वाद एवढा वाढत गेला की विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बैठकीचा त्याग केला. परंतु ही पहिली वेळ नाही. मागील बैठकीतही आम आदमी पार्टीचे खासदार आणि भाजप महिला खासदारांचा वाद झाला होता. त्यानंतर आता वाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. 

ट्रेंडिंग बातमी - आघाडीत वादाची ठिणगी? राष्ट्रवादी विरुद्ध समाजवादी, दोघेही 'या' जागांवर अडले

मुंबईत झालेल्या बैठकीत गुलशन फाऊंडेशननं आपली बाजू मांडली. त्यांनी वक्फ बोर्ड विधेयकाला पाठींबा दर्शवला. पण त्याचवेळी टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी हस्तक्षेप करत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुमची संस्था कुठे आहे? काय काम करते? तुमच्या संस्थेचे ध्येय आणि उद्दीष्ट काय आहेत? संस्थेने इन्कम टॅक्स रिटर्न भरला आहे का? असे प्रश्न त्यांनी केले. कल्याण बॅनर्जी यांचा वाढलेला आवाज पाहिल्यानंतर शिवसेना खासदार आणि समितीतील सदस्य नरेश म्हस्के यांनी कल्याण बॅनर्जींना थांबवण्याचा प्रयत्न केला.

ट्रेंडिंग बातमी - अख्ख्या बदलापुरात अक्षय शिंदेच्या मृतदेहाला जमीन मिळेना, वडिलांची पोलिसात धाव

जर एखादी संघटना वक्फ बोर्ड विधेयकाला पाठींबा दर्शवत असेल तर त्या संघटनेवर दबाव आणण्याचं काम करू नये. असं नरेश म्हस्के यांनी सांगितले. त्यावर तुम्ही पहिल्यांदाच निवडून आल्याचं वक्तव्य कल्याण बॅनर्जीनी केलं. गुलशन संघटनेच्या प्रमुखांनी बॅनर्जी यांच्याबाबत हा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार नरेश म्हस्के व टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वादामुळे बैठकीत तणाव निर्माण झाला. शेवटी विरोधक बैठक सोडून बाहेर पडले.

ट्रेंडिंग बातमी - दुसरं लग्न केलं म्हणून पहिला नवरा संतापला, पेट्रोल घेऊन बायकोच्या ऑफिसात घुसला, पुढे भयंकर झालं

दोन्ही बाजूंनी वातावरण तापलेले असताना समिती अध्यक्षांनी देखील हस्तक्षेप केला. काही वेळेनंतर पुन्हा विरोधक बैठकीला आले. त्यानंतर बैठक सुरू झाली. वक्फ बोर्ड विधेयकाबाबत या बैठका ठिकठिकाणी होत आहे. त्यातून वाद होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढच्या काळातही ज्या ठिकाणी या बैठका होतील त्या ठिकाणीही अशीत स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.