यंदा पंकजा मुंडेंनी भगवान गडावरून दसऱ्या मेळाव्याची सुरुवात हिंदी कवितेने केली. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे यांच्यासह पहिल्यांदाच धनंजय मुंडेही उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदा पंकजा मुंडे यांचे सुपूत्र आर्यमन दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आर्यमन राजकीय पदार्पण करणार का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
इन्सान की ही जाती फिर भी मुश्कील जीना जिते हे
जाती भेद और पिछडेपण का नित्य जहर जो पिते है
उन पिछडो ने अपनाया मुझको
मैं उनकी रोजी रोटी हूं
मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं
पिछडो का दर्द मैने अपना दर्द माना है
उनका बनू सहारा, मन मे मैने ये ठाना है
कमजोर हो जो, चल ना सके, मैं उनके हाथ की लाठी हू
मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं
नक्की वाचा - LIVE UPDATE : माझ्या लेकरापेक्षा मला माझी जनता मला प्रिय - पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी दसऱ्या मेळाव्यात आपल्या मुलाला स्टेजवर आणले. माझ्या लेकरापेक्षा मला माझी जनता प्रिय आहे. माझ्यावर जीएसटी छापा पडला तेव्हा तुम्हीच माझ्यासाठी 12 कोटी रुपये उभे केले. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी जीव दिला. मी माझ्या पोरांपेक्षा तुम्हाला जीव लावते. तुम्ही देखील माझ्यावर माया करता.
आजच्या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक आले आहेत. मी सर्वांना साष्टांग दंडवत करते. कारण माझ्या वडिलांनी तुमची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. हा ऊस तोडणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. मात्र आता मतदान केल्याशिवाय जाऊ नका. माझ्या ऊसतोड कामगारांना आजही पाठीवर पोरगं घेऊन काम करावं लागतं. मी माझ्या ऊसतोड कामकारांचं जीवन बदलल्याशिवाय श्वास सोडणार नाही. तुमच्या लेकरांच्या हातातील मोडलेलं खेळणं पाहून माझ्या जीवाला काय वाटतं सांगू शकत नाही. मी खोटं बोलत नाही.
तुमच्या जीवनाचं भलं करायचंय. तुमच्यासाठी भांडायचं आहे. तुम्हाला शिक्षण द्यायचंय, बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला, रस्ते दिले. मतदान कमी पडलं तरी कधी भेदभाव केला नाही. मंत्री असताना खूप काम केलं. मात्र यावेळी थोडं गणित बिघडलं.
काम करणाऱ्या माणसांच्या पाठिशी आम्हाला उभं राहायचंय. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहायचं नाही. सामान्य माणसांसाठी काम करण्यासाठी मी आहे, राजकारणासाठी मी नाही. आमदार झाले तरी माझ्या आत्महत्या केलेल्या बांधवांच्या वेदना मला आहेत. जो समाजात सगळ्यात वंचित आहे, ज्याची पत नाही आणि ऐपत नाही त्यांच्यासाठी मी राजकारणात आहे. तुम्हाला अभिमान वाटतो म्हणून मी हेलिकॉप्टरमध्ये येते. तुम्ही म्हणालात तर बैलगाडीने येईन.