जाहिरात
4 months ago

आज दसरा या निमित्ताने राज्याच वेगवेगळ्या ठिकाणी दसरा मेळावे होत आहे.शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तर आझाद मैदानात शिंदे सेनेचा दसरा मेळावा होत आहे. तर मराठवाड्याच्या मैदानात भगवानगडावर पंकजा मुंडे तर नारायण गडावर मनोज जरांगेंची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा वेगवान राजकीय घडामोडींचा असणार आहे. शिवाय राज ठाकरे ही पॉडकास्टच्या माध्यमातून पहिल्यांदाच दसऱ्याला जनतेशी संवाद साधणार आहेत. 
 

अजित पवार गटाचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

अजित पवार गटाचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी, रामदास आठवले यांनी घेतली सिद्दिकी कुटुंबियांची भेट

बाबा सिद्दीकींच्या मृत्यूची बातमी कळताच सलमान खानने बिग बॉसचे शूटिंग अर्ध्यावर रद्द केले

बाबा सिद्दीकींच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सलमान खानने आजचे बिग बॉसचे शूटिंग अर्ध्यावर रद्द केले. सलमान खान बिग बॉसच्या सेटवरून लीलावती रुग्णालयात येण्यात निघाला होता. मात्र सुरक्षेच्या कारणस्तवर मुंबई पोलिसांना आता तिथे न येण्याची सूचना केली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा चांगला नेता गमावला- अजित पवार

बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला- अजित पवार

"सत्ताधाऱ्यांनी पायउतार होण्याची गरज", बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

 "सत्ताधाऱ्यांनी पायउतार होण्याची गरज", बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

Live Update : उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित...

Live Update : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून गुलाबराव पाटील काय म्हणाले?

आजचा मेळावा पाहिल्यानंतर 40 वर्षांपूर्वीच्या मेळाव्याची आठवण झाली. बाळासाहेब काय बोलणार याची आम्हा शिवसैनिकांना उत्सुकता असायची. मी बरेच मुख्यमंत्री पाहिले, 2 वर्षात 14 वेळा जळगावमध्ये येण्याचा रेकॉर्ड एकनाथ शिंदेंनी केला आहे. संजय राऊतांना सांगतोय की कौवा कितनी भी उंचाईपर जाए वो कबूतर नही बनता, कौन जीतेगा कौन हारेगा ये तो वक्त बताएगा.

- गुलाबराव पाटील

Live Update : मनोज जरांगे पाटील यांना धन्यवाद - भास्कर जाधव

मनोज जरांगे पाटील यांना धन्यवाद. यांनी वेळीच सरकारला ओळखलं. अंगणवाडी सेविका हजारोंच्या संख्येने मोर्चा काढतायेत. परंतू माझ्या महिला भगिनींना माहितीये हे विश्वासघातकी आहेत. चारशे रुपयांचा गॅस सिलिंडर आता बाराशेपर्यंत गेलाय - ठाकरे गटाचे शिवसेना नेते भास्कर जाधव

आम्हाला आमच्या बहिणी लाडक्या आहेतच. मात्र त्यांची सुरक्षितताही जास्त महत्त्वाची आहे - सुषमा अंधारे

आम्हाला आमच्या बहिणी लाडक्या आहेतच. मात्र त्यांची सुरक्षितताही जास्त महत्त्वाची आहे. 

पुण्यात गेल्या सात महिन्यात २६५ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. बदलापूरनंतर सोनपेठला पुन्हा एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाला. - सुषमा अंधारे

Live Update : क्कार क्रेडीट घ्यायचा नाद करू नका. - सुषमा अंधारे

फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून, शिंदेंनी तापोळ्याची जमीन विकून लाडक्या बहिणींना पैसे दिलेले नाही. दोघांनी आपल्या खिशात घालून पैसे दिलेले नाही. हे पैसे आमच्या कष्टाचे पैसे आहेत. नागरिकांनी भरलेल्या टॅक्सचे पैसे आहेत. तुम्ही पोस्टमन आहात, बेक्कार क्रेडीट घ्यायचा  नाद करू नका. - सुषमा अंधारे

Live Update : फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र देवेंद्र फडणवीस - सुषमा अंधारे

फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र देवेंद्र फडणवीस आहेत. या देशात संविधानाला धोका आहे. तो अजूनही गेला नाही. - सुषमा अंधारे

Live Update : आझाद मैदानावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात...

आझाद मैदानावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात...

Live Update : गेल्या दहा वर्षात राज्यावरील कर्ज तिपटीने वाढलं - सुषमा अंधारे

शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून...

1961 पासून 2014 पर्यंत महाराष्ट्र राज्यावर दोन लाख 37 हजार कोटी. गेल्या दहा वर्षात कर्ज झालं 9 लाख 54 हजार 911 कोटी. गेल्या दहा वर्षात तिपटीने कर्ज वाढलं. तरी योजनांची खैरात सुरू आहे. - सुषमा अंधारे 

Live Update : ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात...

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात...

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावर झालं रावणाचं दहन, पंतप्रधान-राष्ट्रपतींनी राम-लक्ष्मणाची केली आरती

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावर झालं रावणाचं दहन, पंतप्रधान-राष्ट्रपतींनी राम-लक्ष्मणाची केली आरती

Live Update : आझाद मैदानावर पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात

आझाद मैदानावर पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात

Live Update : शिवाजी पार्क परिसरात ढगाळ वातावरण

शिवाजी पार्क परिसरात ढगाळ वातावरण

शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यांवर पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे. मागील तीन दिवस मुंबईत संध्याकाळच्या वेळेत पाऊस पडतोय. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यावर  पावसाचे सावट जरी असले तरी शिवसैनिकांचा उत्साह मात्र शिगेला असलेला पहायला मिळतोय. 

Live Update : दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलणार!

आज शिवाजी पार्कातील मैदानात दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदाच संबोधित करणार आहे. पहिल्यांदाच आदित्य ठाकरे दसरा मेळाव्यात बोलणार आहेत. 

Live Update : आज किती आहे सोन्याचा भाव?

दसऱ्याच्या दिवशी सोन खरेदी करण्याची लगबग असते. मात्र गेल्या काही दिवसात सोन्याचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. आज दहा ग्रॅम सोन्याचा भाव 75 हजार 750 इतका आहे, तर एक किलो चांदीचा भाव 97 हजार असल्याची माहिती लागू बंधूचे मालक कुणाल लागू यांनी दिली. 

Live Update : शिवाजी पार्कात ज्येष्ठ शिवसैनिकांची गर्दी

शिवाजी पार्कात ज्येष्ठ शिवसैनिकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शिवसैनिक आता शिवाजी पार्क मैदानावर येऊ लागलेत 

जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहायचं नाही - पंकजा मुंडे

काम करणाऱ्या माणसांच्या पाठिशी आम्हाला उभं राहायचंय. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहायचं नाहीय. सामान्य माणसांसाठी काम करण्यासाठी मी आहे, राजकारणासाठी मी नाही. आमदार झाले तरी माझ्या आत्महत्या केलेल्या बांधवांच्या वेदना मला आहेत. जो समाजात सगळ्यात वंचित आहे, ज्याची पत नाही आणि ऐपत नाही त्यांच्यासाठी मी राजकारणात आहे. तुम्हाला अभिमान वाटतो म्हणून मी हेलिकॉप्टरमध्ये येते. तुम्ही म्हणालात तर बैलगाडीने येईन.

माझ्या ऊसतोड कामगारांचं जीवन बदलल्याशिवाय श्वास सोडणार नाही- पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

ऊस तोडणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे. मात्र आता मतदान केल्याशिवाय जाऊ नका. माझ्या ऊसतोड कामगारांना आजही पाठीवर पोरगं घेऊन काम करावं लागतं. मी माझ्या ऊसतोड कामगारांचं जीवन बदलल्याशिवाय श्वास सोडणार नाही. तुमच्या लेकरांच्या हातातील मोडलेलं खेळणं पाहून माझ्या जीवाला काय वाटतं सांगू शकत नाही. मी खोटं बोलत नाही.  

तुमचं जीवन भलं करायचंय. तुमच्यासाठी भांडायचं आहे. तुम्हाला शिक्षण द्यायचंय, बीड जिल्ह्याल ऐतिहासिक वीमा दिला, रस्ते दिले. मतदान कमी पडलं तरी कधी भेदभाव केला नाही. मंत्री असताना खूप काम केलं. मात्र यावेळी थोडं गणित बिघडलं.

माझ्या लेकरापेक्षा मला माझी जनता मला प्रिय - पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी दसऱ्या मेळाव्यात आपल्या मुलाला स्टेजवर आणले. माझ्या लेकरापेक्षा मला माझी जनता प्रिय आहे. माझ्यावर जीएसटी छापा पडला तेव्हा तुम्हीच माझ्यासाठी पैसे उभे केले. निवडणुकीत निकालानंतर अनेकांनी जीव दिला. मी माझ्या पोरांपेक्षा तुम्हाला जीव लावते. तुम्ही देखील माझ्यावर माया करता. 

माझा 12 वर्षांचा प्रारब्ध संपला - धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

12 वर्षांच्या तपानंतर भगवान भक्ती गडावरील दसऱ्याच्या मेळाव्याला आलो आहे. पंकजाताई मी आज भारावून गेलोय. या दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. ही तरुण बांधवांना कळाली पाहिजे. या पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा गोपीनाथ मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली. आता ही परंपरा पंकजा ताई चालवत आहे. मला माझ्या भगिनीचा अभिमान आहे.

माझा 12 वर्षांचा प्रारब्ध संपला आहे.

निवडणूक राजकारणापलिकडील विचारांचा, भक्तीचा, शक्तीचा आणि मुंडे साहेबांच्या आणि त्यांचा वारसा चालवणाऱ्या पंकजाताईचा हा दसरा मेळावा आहे. आपल्या सर्वांचं जीवन संघर्षातून गेलं आहे. मुंडे साहेबांनी जो संघर्ष स्वत:साठी नव्हता, पंकजा मुंडे किंवा आमचा संघर्ष तुमच्यासाठी आहे. तुमची जबाबदारी मुंडे साहेबांनंतर पंकजा ताईंनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. यापुढे आपल्याला ताईंच्या सोबत राहायचं आहे.

Live Update : धनंजय मुंडे भगवान गडावरून...

भगवान गडाच्या भूमिपूजनाला 1960 रोजी तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. तेव्हा या गडाला काय नाव द्यायचं असा प्रश्न भगवान बाबांना पडला होता. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले, तुमच्या नावातच भगवान आहे. त्यामुळे तुमचंच नाव या गडाला द्यायला हवं.  

- धनंजय मुंडे 

Live Update : 12 वर्षांच्या तपानंतर दसरा मेळाव्याला आलोय - धनंजय मुंडे

भगवान गडावरून धनंजय मुंडे Live...

मी आज ऐवढं भारावून गेलोय. 12 वर्षांच्या तपानंतर दसरा मेळाव्याला आलोय. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी-वेगळी परंपरा आहे. ही परंपरा माझ्या सर्व पिढीला समजायला हवी. भगवान गडाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा. या पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा गोपीनाथ मुंडेंनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली. आज माझी मोठी बहीण पंकजा मुंडे चालवतेय. बारा वर्षांचा प्रारब्ध मीही भोगला तिनेही भोगला. हा प्रारब्ध आज संपला.

जे स्वप्न गोपीनाथ मुंडे साहेबांनी पाहिलं होतं ते आज पूर्ण झालंय - सुजय विखे पाटील

जे स्वप्न गोपीनाथ मुंडे साहेबांनी पाहिलं होतं ते आज पूर्ण झालंय. संपूर्ण मुंडे कुटुंब आज एकाच व्यासपीठावर आहे. दोन्ही भाऊ-बहीण एकत्र येऊन महाराष्ट्राची प्रगती करीत राहो - 

सुजय विखे पाटील

Live Update : मनोज जरांगे पाटील नारायण गडावरून Live... जरांगे पाटील म्हणतात,


मनोज जरांगे पाटील नारायण गडावरून Live...


जरांगे पाटील म्हणतात, 


कधी वाटलं नव्हतं. आपण सर्वजणं इतक्या ताकदीनं एकत्र याल. हा जनसमुदाय न्यायाचा आहे. एका दुख:कडून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावरील संस्कार आहेत. ते संस्कार कधीच जातीयवाद करीत नाहीत. प्रचंड ताकदीने असलेला हा समुदाय या राज्यावर समुद्रासारखा पसरला आहे. पण मस्तीत मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं प्रत्येकाला साथ देण्याचे काम समुदायाने केले. जातीयवाद कधी केला नाही. जात यांना कधी शिवली पण नाही. मी येवढा जनसमुदाय पहिल्यांदा पाहिला. तुमच्या चरणी नतमस्तक व्हावं असं वाटलं. 

Live Update : भगवान गडावरून... प्रीतम मुंडे यांच्याकडून प्रास्ताविकाला सुरूवात...

भगवान गडावरून...

प्रीतम मुंडे यांच्याकडून प्रास्ताविकाला सुरूवात...

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत भगवानबाबांची आरती संपन्न

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत भगवानबाबांची आरती संपन्न

भगवानगडावरील इंटरनेटसेवा ठप्प, पंकजा मुंडेंचं भाषण उशीराने; नागरिकांचा खोळंबा

भगवानगडावरील इंटरनेटसेवा ठप्प, पंकजा मुंडेंचं भाषण उशीराने; नागरिकांचा खोळंबा

मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर दाखल झाले आहेत. इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. थोड्याच वेळात ते मराठा समाजाला संबोधित करणार  आहेत. 

पंकजा मुंडे थोड्याच वेळात भगवान गडावर पोहोचणार

भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे थोड्याच वेळाच पोहचणार आहेत. तर नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पोहोचले आहेत. दोन्ही मेळाव्यांना तुफान गर्दी झाली आहे. थोड्याच वेळात हे दोन्ही नेते संबोधित करतील. 

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट

बोपदेव घाट  सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पुणे शहरातील बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर तीन आरोपी हे  फरार झाले होते.  तीनही आरोपींना अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.  यातील एकाला अटक करण्यात आली आहे तर, उर्वरित दोन आरोपींना नागपूर मधून ताब्यात घेण्यात आले आहे

राज्यातील होमगार्ड्सचे मानधन झाले दुप्पट, सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यात आले आहे. तसा शासन आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिदिन 570 रुपयांवरून हे मानघ 1083 रुपये इतके मिळणार आहे. त्याच बरोबर उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 55,000 होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येईल.  

शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी मागितली भिक्षा

साई बाबा संस्थानच्यावतीने विजयादशमीच्या दिवशी भिक्षा झोळी कार्यक्रमाच आयोजन केलं जातं. यंदा इतर भाविकां प्रमाणे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी देखील साईंची भिक्षा झोळी परिधान करत शिर्डीत भिक्षा मागीत. 

राज ठाकरेंचे दसऱ्याला मतदारांना थेट आवाहन

राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ज्यांना तुम्ही आजपर्यंत जोपासलं त्यांनी तुमच्या बरोबर प्रतारणा केली आहे. तुम्हाला गृहीत धरलं आहे. त्यातून तुमचं नुकसान होत आहे. असे राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे तरूण, तरूणी, शेतकरी राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मी विनंती करतो की या निवडणुकीत बेसावध राहू नका असे आवाहन राज यांनी केले. ज्यांनी तुमच्या मतांची प्रतारणा केली त्यांना अद्दल घडवा असेही ते म्हणाले. मी हेवा वाटावा अशा महाराष्ट्राचे स्वप्न बघतोय. नवा महाराष्ट्र साकारण्याची संधी द्या. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडवून दाखवेन असे राज यावेळी म्हणाले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  पहिल्यांदाच दसऱ्याच्या दिवशी जनतेशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे दसरा मेळाव्यातून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहेत, तसेच राज यांच्या वक्तव्याकडेही सर्वांचे लक्ष आहे. 

मनोज जरांगेंचा आवाज नारायण गडावर घुमणार

नारायण गडावर दुपारी  12 वाजता मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळावा घेणार आहेत. मेळाव्यासाठी भव्य व्यासपीठ उभारले आहे. मनोज जरांगे कारने मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचतील. 200 एकरवर पार्किंग व्यवस्था तर 200 एकरवर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी निघणाऱ्या मिरवणुकीत जरांगेंवर 51 जेसीबीद्वारे फुलांची उधळण होईल. इथं येणाऱ्यांसाठी 500 क्विंटल बुंदी, पाण्याचे ५१ टँकर राहणार आहेत. 

भगवान गडावर पंकजा मुंडे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार

भगवान गडावरील दसरा मेळाव्यासाठी प्रतिम मुंडे, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, सुजय विखे, महादेव जानकर हे उपस्थित राहणार आहे. दुपारी 12  वाजता मेळावा सुरू होईल. मेळाव्यासाठी 100 बाय 100 फुटांचे व्यासपीठ उभारले आहे. तर 150 मीटरवर तीन हेलिपॅड तयार केले आहेत. हेलिपॅडपासून मेळाव्यापर्यंत पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शिवाय 25 फुटांचा हार क्रेनद्वारे घालून, पंकजा मुंडे यांचे स्वागत केले जाणार आहे. 

संघ मुख्यालयात शस्त्र पुजन संपन्न

राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्र पुजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात संघ स्वयंम सेवक उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांनी दसऱ्याच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.  

ठाकरे- शिंदे दसरा मेळाव्यात काय बोलणार?

उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दसऱ्या निमित्ताने शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानात दसरा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मेळाव्यांकडे सर्वांचेच लक्ष असणार आहेत. या मेळाव्यातून ठाकरे शिंदे काय बोलतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे.