अजित पवारांनंतर शिंदे -फडणवीस दिल्लीत, चर्चांना उधाण, मंत्रिमंडळ विस्तार रखडणार?

शिंदे आणि फडणवीस एकाच वेळी दिल्लीत असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहे. अनेक तर्ववितर्क लढवले जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. तर देवेंद्र फडणवीस ही दिल्ली दौऱ्यावर आहे. शिंदे आणि फडणवीस एकाच वेळी दिल्लीत असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहे. अनेक तर्ववितर्क लढवले जात आहे. या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, शिवाय आगामी रणनितीवर चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जाते. काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेत आपल्याला 80 जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर शिंदेही दिल्लीत धाव घेत आहे. त्यांच्या मागामाग  फडणवीसही दिल्लीत पोहचत आहेत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा पुर्वनियोजत असल्याचे सांगितले जात आहे. ते दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या बैठकीचे अध्यक्ष असणार आहेत. नीती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणखी काही निधी मिळणार आहे का ? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राल काय मिळाले अशी विचारणा विरोधकांनी केली होती. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काही मिळाले नाही असे चित्र होते. त्यामुळे या बैठकीत्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पदरात काय पडतं का त्याची चाचपणी शिंदे करतील. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - कारगिल युद्धात गमावले 2 पाय आणि 1 हात, नाशिकचे 'नायक' आजही देतायत सर्वांना प्रेरणा

 
शिंदे जरी निती आयोगाच्या बैठकीला दिल्लीत जात असले तरी ते  आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. महायुती म्हणून विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना आव्हानं, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तसेच जागा वाटप बाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय शिंदे जागा वाटपाबाबत आक्रमक होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाल्यात अशी त्यांची भूमिक आहे. त्यात बरोबर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा एकनाथ शिंदेच असावेत यासाठी ही गळ घातली जाण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातमी - पावसाचं आजही धुमशान, शाळांना सुट्टी, मुंबई पुणे रायगडला रेड अलर्ट, आतापर्यंत 10 बळी

दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि विधानसभा निवडणुकीत 80 जागांची मागणी केली असल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहेत. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल होणार आहे. भाजप राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत फडणवीस हजर राहतील.केंद्रांचे फ्लॅगशीप प्रोग्राम राबवणे आणि राज्यात भाजपचा विस्तार यावर चर्चा होणार आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून जोरदार खलबतं दिल्लीत होण्याची शक्यता आहे.

Advertisement