अमजद खान, प्रतिनिधी
KDMC Election 2026 latest News : राज्यात 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं आणि भाजपने 20 बिनविरोध उमेदवार निवडून दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही मोठा धक्का बसला आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदे गटाने पुन्हा मोठा झटका दिला आहे. प्रभाग क्रमांक 30 ड मधून ठाकरे गटाचे उमेदवार रामचंद्र माने यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन पाटील यांना पाठिंबा दिला आहे. प्रभाग 30 ड मधून अर्जुन पाटील हे शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील शाखेत माने यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या कल्याण डोंबिवली दौऱ्याआधी ठाकरे गटाला हा धक्का देण्यात आला आहे.
महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध
कल्याण डोंबिवलीत निवडणुकीचा आधीच भाजपा आणि शिवसेनेने जोरदार धक्का द्यायला सुरुवात केली. केडीएमसीत महायुतीचे एकूण 20 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. यामध्ये भाजपचे 14 तर शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवारांच्या समावेश आहे. उर्वरित 102 जागांवर मतदान होणार आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाने आणखी एक धक्का ठाकरे गटाला दिला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार रामचंद्र माने हे केडीएमसी प्रभाग क्रमांक 30 ड मधून ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. गेल्या तीन ते चार दिवसापासून त्यांच्या जोरदार प्रचार सुरू होता.
नक्की वाचा >> BMC Election 2026 : ठाकरेंच्या सभेला महापालिकेची परवानगी, मुंबईतील ठिकाण अन् तारीख ठरली, पण 'या' 24 अटी..
राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ
परंतु रामचंद्र माने यांच्या हा प्रचार आज डोंबिवली संपला. ठाकरे गटाचे उमेदवार रामचंद्र माने यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन पाटील यांनी पाठिंबा दिला आणि पक्षात प्रवेश केलं 15 तारखेला मतदान होणार आहे. रामचंद्र माने यांच्या चिन्ह मशाल देखील ईव्हीएम वर असणार आहे. रामचंद्र माने यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असला तरी त्यांच्या चिन्हावर आता किती मतदान होणार हे पाहणे महत्त्वाच्या ठरणार आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या कल्याण डोंबिवलीत उद्या दौरा आहे. या दौऱ्या आधी शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.