काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ गेला आणि सोबत केंद्रातील सत्ताही गेली

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून

जाहिरात
Read Time: 4 mins
नंदूरबार:

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून खासदार म्हणून कोणाला निवडून द्यायचे हे इथली आदिवासी जनता ठरवते. गांधी कुटुंबासाठी हा मतदारसंघ अत्यंत लाडका मतदारसंघ होता. आधार कार्ड हे आज महत्त्वाचा पुरावा म्हणून ओळखले जाते. आधार कार्डाशी अनेक योजना जोडण्यात आल्या असून हे कार्ड नसेल तर या योजनांचा लाभ घेता येत नाही.  केंद्रात युपीएची सत्ता असताना जानेवारी 2009 मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. या प्राधिकरणाद्वारे आधार कार्डाच्या वितरणास सुरुवात करण्यात आली होती.  29 सप्टेंबर 2010 रोजी देशातील पहिले आधार कार्ड वितरीत करण्यात आले होते. हे कार्ड नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावातल्या रंजना सोनवणे यांना देण्यात आले होते. या वितरणासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग, संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या त्यावेळच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि यूआयडीएआयचे तत्कालीन चेअरमन नंदन निलकेणी उपस्थित होते.  

काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ इथेच फुटायचा

गांधी घराणे आणि नंदुरबार यांचे नाते इतके घट्ट होते की लोकसभा निवडणुकीचा प्रचार ते नंदुरबारपासूनच करायचे. या मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केल्यास आपल्याला यश मिळते असा इंदिरा गांधी यांना आत्मविश्वास वाटायचा. त्यामुळे त्या याच मतदारसंघातून प्रचाराचा नारळ फोडायच्या.  राजीव गांधी यांनी त्यांच्या आईची ही परंपरा कामय ठेवली होती. पतीच्या पश्चात सोनिया गांधी यांनीही ही परंपरा पुढे सुरू ठेवली होती. 2014 पर्यंत ही परंपरा सुरू राहिली. 2014 साली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची पहिली प्रचारसभा नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात येणार होती, मात्र दोघांनी ऐनवेळी त्याला नकार दिला होता. यामुळे ही सभा रद्द झाली आणि आजपर्यंत या मतदरासंघात एकदाही पराभूत न झालेली काँग्रेस 2014 च्या मोदी लाटेत सपाट झाली. 

Advertisement

गावित एके गावित

नंदुरबार  जिल्ह्यामधील चार व धुळे जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ मिळून नंदुरबार लोकसभा मतदारसंघ बनला आहे.  2014 साली काँग्रेसचा हा बालेकिल्ला भाजपच्या हिना गावित यांनी उद्ध्वस्त केला.  1981 ते 2014 या काळात झालेल्या एक पोटनिवडणूक आणि 8 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या माणिकराव गावितांनी विजय मिळवला होता. 2014 मध्ये हिना गावित यांचे वडील डॉ.विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत हिना गावित यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

Advertisement
पेशाने डॉक्टर असलेल्या हिना गावित यांनी पहिल्याच फटक्यात माणिकरावांना चीतपट करत काँग्रेससह सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 2019 च्या निवडणुकीत हिना गावित यांनी काँग्रेसच्या के.सी.पाडवी यांना पराभूत करत 2014 चा विजय हा अपघात नव्हता हे दाखवून दिलं होतं. हिना गावित यांच्या संसदेतील कामगिरीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि स्वत: पंतप्रधान मोदी खूश असल्याचे बोलले जाते. यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट पक्के मानले जाते.   अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर साक्री मतदार संघात शिंदे गटाचा आमदार आहे. नंदुरबार, शहादा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. 

नंदुरबार- डॉ. विजयकुमार गावित, भाजप 

शहादा तळोदा - राजेश पाडवी, भाजप 

शिरपूर -काशिनाथ पावरा, भाजप 

अक्कलकुवा-  के सी पाडवी, काँग्रेस 

नवापूरमध्ये- शिरीष नाईक, काँग्रेस 

साक्री-मंजुळा गावित, शिवसेना (शिंदे गट)

हे पक्षीय बलाबल पाहाता नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीची ताकद जास्त असल्याचे दिसून येत आहे. हिना गावित यांच्यावर त्यांच्या पक्षातील वरिष्ठांची जरी मर्जी असली तरी महायुतीतील घटक पक्ष मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.  डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने नंदुरबारमधील गावित विरोधक एकवटले होते.  खासदार डॉ. हिना गावित, मंत्री विजयकुमार गावित व जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांना असलेला विरोध या फोरमच्या परिषदेत दिसून आला होता. विशेष म्हणजे या परिषदेत भाजपाचे आमदार व नेते मंडळीही उपस्थित होती. हिना गावित यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्या त्याला सर्व ताकद पणाला लावून जिंकून आणू असे शिवसेनेच्या चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले होते. 

Advertisement

महायुतीतील ही नाराजी पथ्यावर पडेल अशी काँग्रेसची धारणा आहे. हिना गावित यांच्याविरोधात भाजपच्या मित्रपक्षांमध्ये उफाळून आलेली नाराजी त्यांना भोवणार का त्या पुन्हा निवडून येणार याचा फैसला नंदुरबारकर करतील.

Topics mentioned in this article