Election Results 2024: महाराष्ट्र निवडणूक निकाल : महायुती की मविआ, BMC च्या सेमीफायनलमध्ये कोण सरस?

मुंबई कोणाची होणार याची झलक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाल्याचं सांगितलं जात आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या निवडणुकीत महायुतीचे 288 पैकी 230 हून अधिक जागांवर विजयी कल आहेत. तर या निवडणुकीत ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येईपर्यंत या निवडणुकीचा अंदाज बांधणं राजकीय तज्ज्ञांनाही शक्य होत नव्हतं. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल असं सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा निकाल समोर आला तेव्हा भल्याभल्यांना धक्का बसला. महाविकास आघाडी इतक्या मोठ्या संख्येने पराभूत होईल असा कोणी विचारही केला नव्हता. 

नक्की वाचा - 'मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसं भेदायचं हे जाणतो'; अभूतपूर्व यशानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान मुंबईत महायुतीला 22 जागा मिळवण्यात यश आलं असून महाविकास आघाडीला 14 जागांवर विजय मिळवता आला आहे.  विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागलं आहे. त्यामुळे मुंबई कोणाची होणार याची झलक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाल्याचं सांगितलं जात आहे. 

भाजप - 16
शिंदे गट - 5
अजित पवार गट - 1

ठाकरे गट - 10
काँग्रेस - 3
समाजवादी पक्ष - 1

Advertisement

नक्की वाचा - पाडा पाडा पाडा! असं पवारांनी ज्या मतदार संघात सांगितलं, तिथं काय झालं?


मुंबईतील आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी..

  1. सायन कोळीवाडा - कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)
  2. जोगेश्वरी पूर्व - अनंत नर (ठाकरे गट)
  3. घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप)
  4. दिंडोशी - सुनील प्रभू (ठाकरे गट)
  5. भांडुप पश्चिम - अशोक पाटील - (शिंदे गट)
  6. मालाड पश्चिम - अस्लम शेख (काँग्रेस)
  7. कलिना - संजय पोतनीस (ठाकरे गट)
  8. अंधेरी पश्चिम - अमित साठम (भाजप)
  9. चेंबूर - तुकाराम काते (शिंदे गट)
  10. वांद्रे पश्चिम - आशिष शेलार (भाजप)
  11. गोरेगाव - विद्या ठाकूर (भाजप)
  12. मुंबादेवी - अमिन पटेल, (काँग्रेस) 
  13. वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई, (ठाकरे गट)
  14. बोरिवली - संजय उपाध्याय (भाजप)
  15. वरळी - आदित्य ठाकरे (ठाकरे गट)
  16. शिवडी - अजय चौधरी (ठाकरे गट)
  17. माहीम - महेश सावंत (ठाकरे गट)
  18. कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
  19. अणुशक्ती नगर - सना मलिक (अजित पवार गट)
  20. वडाळा - कालिदास कोळंबकर (भाजप)
  21. विलेपार्ले - पराग अळवणी (भाजप)
  22. विक्रोळी - सुनील राऊत (ठाकरे गट)
  23. वर्सोवा - हरुन खान (ठाकरे गट)
  24. मुलुंड -  मिहीर कोटेचा (भाजप)
  25. मानखुर्द शिवाजीनगर - अबू आझमी (समाजवादी पक्ष)
  26. मलबार हिल - मंगलप्रभात लोढा (भाजप)
  27. मागाठाणे - प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
  28. कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (भाजप)
  29. घाटकोपर पूर्व - पराग शहा (भाजप)
  30. धारावी - ज्योती गायकवाड (काँग्रेस)
  31. दहिसर - मनीषा चौधरी (भाजप)
  32. कुलाबा - राहुल नार्वेकर (भाजप)
  33. चारकोप - योगेश सागर, (भाजप) 
  34. चांदिवली - दिलीप लांडे (शिंदे गट)
  35. भायखळा - मनोज जामसुतकर (ठाकरे गट)
  36. अंधेरी पूर्व - मुरजी पटेल (भाजप)