NCP News: शरद पवारांना आणखी एक दणका, आता 'हा' नेताही साथ सोडणार, 'घड्याळ' हाती बांधणार

मुंबई येथे लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बुलडाणा:

दिवाकर माने

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शरद पवारांना अजित पवारांना दणका दिला होता. अजित पवारांचा केवळ एकच खासदार निवडून आला होता. त्यामुळे अजित पवारांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवारांनी जोरदार कमबॅक केले. ऐवढेच नाही तर पुन्हा सत्तेही परतले. त्यानंतर मात्र सर्व गणित बदलली. एक एक नेता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गोटात सहभागी झाला. आता आणखी एक नेता शरद पवारांची साथ सोडणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जिंतूर विधानसभेचे माजी आमदार विजय भांबळे हे आता शरद पवारांची साथ सोडणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना अजित पवारांच्या गटात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या अजित पवारांच्या गटात प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shocking news: लहान मुलांच्या हाडांनी भरलेली बॅग, 'ते' दोघे अन् अंगावर काटा आणणारा खुलासा

मुंबई येथे लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विजय भांबळे यांनी, जिंतूर विधानसभा मतदारसंघांमधून, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. परंतु त्यामध्ये त्यांना राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पराभूत केला. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. मेघना बोर्डीकर यांना त्यांनी जोरदार लढत दिली होती. पण त्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यांच्या प्रवेशाने अजित पवार गटाची ताकद जिल्ह्यात वाढणार आहे. 

Advertisement