Tukaram Bidkar: राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघातात मृत्यू, दुचाकीवर प्रवास करणे जीवावर बेतले

महसूल मंत्री चंद्रशेखर बानवकुळे हे शिवणी विमानतळावर येणार होते. त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर हे दुचाकीवरून गेले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विमानतळावर भेट घेतल्यानंतर परतत असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिडकर यांच्या सहअन्य दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मंत्र्यांना भेटण्यासाठी बिडकर हे दुचाकीवर गेले होते. हीच त्यांच्याकडून चुकी झाली असं आता बोललं जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महसूल मंत्री चंद्रशेखर बानवकुळे हे शिवणी विमानतळावर येणार होते. त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर हे दुचाकीवरून गेले होते. त्यांची भेट झाल्यानंतर ते परतीचा प्रवास करत असतानाच त्यांच्या दुचाकीला एका मालवाहू गाडीने जबर धडक दिली. शिवणी विमानतळावरून परत येत असताना शिवर गावाजवळील राष्ट्रीय महामार्गवर हा अपघात झाला. दुचाकीवरील प्रा. तुकाराम बिडकर व त्यांचे मित्र प्रा.राजदत्त मानकर होते. ते यात गंभीर जखमी झाले.

ट्रेंडिंग बातमी - HarshVardhan Sapakal: काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कोण? काय आहेत त्यांच्या जमेच्या बाजू?

त्यांना लगेचच वाहनातून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ज्या वाहनांने बिडकर यांच्या दुचाकीला धडक दिली त्या वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात होती. गाडी वेगाने नेण्याच्या नादात हा अपघात झाला. विशेष म्हणजे  काही महिन्यांपूर्वी ही  तुकाराम बिडकर यांचा अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर त्यावेळी मुंबईत उपचार करण्यात आले होते. त्यातून ते सावरले होते. तोच त्यांचा पुन्हा अपघात झाला. यावेळी मात्र त्यांना मृत्यूने गाठले. 

ट्रेंडिंग बातमी - Crime News: सख्खा भाऊ-मामाच ठरले नराधम, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर भयंकर प्रकार उघड

तुकाराम बिडकरे यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले होते. ते मूर्तिजापूर मतदार संघातून विधानसभा निवडणूक जिंकले होते. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काम करत होते. तुकाराम बिरकड 2004 ते 2009 या मुर्तीजापूर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी याकाळात जय बजरंग नावाने व्यायाम शाळा उभ्या केल्या होत्या. त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात सर्वच क्षेत्रात काम करण्यावर भर दिला होता.  

Advertisement