जाहिरात

Crime News: सख्खा भाऊ-मामाच ठरले नराधम, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर भयंकर प्रकार उघड

एकीकडे भाव तिच्यावर अत्याचार करतच होता. त्याच वेळी तिच्या मामाचीही तिच्यावर वाईट नजर पडली.

Crime News: सख्खा भाऊ-मामाच ठरले नराधम, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर भयंकर प्रकार उघड
वसई:

मनोज सातवी 

नात्याला काळीमा फासणारी अतिशय दुर्दैवी घटना वसईत समोर आली आहे. या घटनेनं  सर्वच जण हादरून गेले आहेत. एका अल्पवयीन मुलीवर तीच्या सख्ख्या भावा बरोबरच तीच्या मामाने ही अत्याचार केले. हे अत्याचार सलग पाच महिने हे दोघेही आलटूनपालटून करत होते. सतत होत असलेल्या अत्याचारामुळे ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहील. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. पिडीत मुलीने याबाबत पोलीसांना सांगितल्यानंतर पोलीसही हादरून गेले आहेत. धक्कादायक म्हणजे यामुलीचा मामानेच गर्भपात ही केला.    

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वसईत अत्यंत धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्या अठरा वर्षीय भाऊ आणि मामाने राहत्या घरात तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार केले. आधी भावाने पीडितेचे हात पाय ओढणीने बांधले. त्या स्थितीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शिवाय कुणाला काही बोलू नकोस अशी धमकी ही दिली. त्यानंतर हा नराधम भाऊ वेळीवेळी पीडितेवर अत्याचार करत राहीला. प्रत्येक वेळी तो तीचे हात पाय बांधत असत. शिवाय आरडाओरडा करू नये म्हणून तीचे कपड्याने तोंडही बंद करत होता.  

ट्रेंडिंग बातमी -  'सॉरी मम्मी,पापा, मी तुमचं स्वप्न...' भावनिक पत्र लिहीत 18 वर्षाच्या मुलीचे टोकाचे पाऊल, 'ती'ने असं का केलं?

एकीकडे भाव तिच्यावर अत्याचार करतच होता. त्याच वेळी तिच्या मामाचीही तिच्यावर वाईट नजर पडली. पीडित मुलीच्या मामाने ती घरामध्ये झोपलेली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. अत्याचार करताना तिच्या तोंडावर हात ठेवुन ओरडु नको अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. ऑगस्ट 2024 ते डिसेबर 2024 या पाच महिन्यांच्या कालावधीत दोघांकडून  या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते. 

ट्रेंडिंग बातमी - Ramdas Kadam:'ही तर उद्धव ठाकरेंच्या सणसणीत कानफाटात' साळवींच्या प्रवेशावरून कदमांचा टोला

जीवे मारण्याच्या धमकीमुळे ती याची वाच्यता कुठेही करत नव्हती. पण पाच महिने होत असलेल्या अत्याचारामुळे ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहीली. ही बाब तिच्या मामाच्या लक्षात आली. त्याने तिला मुंबईत ग्रँट रोडला एका दवाखान्यात नेले. तिथे तिचा गर्भपात केला. या सर्व प्रकाराने ही मुलगी हादरून गेली होती. ती शाळा शिकत होती. अशा स्थिती तिच्यावर अत्याचार झाले होते. शेवटी तिने पोलिस स्थानकात धाव घेतली. आपल्या बरोबर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने पोलिसांना दिली.  

ट्रेंडिंग बातमी - Rinku Rajguru: 'रिंकू आणि मी ठरवूनच...','त्या' फोटोवरुन कृष्णराज महाडिक पहिल्यांदाच थेट बोलले

याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात पोस्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने वसई पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तिचा भाऊ आणि मामा विरोधात  पोस्कोनुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई पोलीसांकडून दोन्ही आरोपींची कसून चौकशीही करण्यात आली.