काँग्रेसची चौथी यादी समोर आली असून यामध्ये काँग्रेसने दोन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये धुळे आणि जालना या मतदारसंघाचा समावेश आहे.
चौथ्या यादीनुसार, काँग्रेसकडून जालन्यातून कल्याण काळे तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. कल्याण काळे यांना रावसाहेब दानवे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. तर धुळ्यातून सुभाष भामरे यांच्याविरोधाधात शोभा बच्छाव लढणार आहे. ही दोन चर्चेत असलेल्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली असली तरी मुंबईतील मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई मध्य या मतदारसंघातील उमेदवारांची नावं अद्यापही गुलदस्त्यात आहेत.
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आतापर्यंत 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई मध्य या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा कधी करणार याची प्रतीक्षा आहे.
काँग्रेसकडून आतापर्यंत जाहीर केलेले उमेदवार -
1 सोलापूर – प्रणिती शिंदे
2 कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
3 पुणे – रवींद्र धंगेकर
4 नंदुरबार – गोवाल पाडवी
5 अमरावती – वळवंत वानखेडे
6 लातूर – डॉ. शिवाजी कलगे
7 नांदेड – वसंतराव चव्हाण
8 रामटेक - रश्मी बर्वे
9 भंडारा-गोंदिया - प्रशांत पडोळे
10 नागपूर - विकास ठाकरे
11 गडचिरोली - नामदेव किरसान
12 सोलापूर- प्रणिती शिंदे
13 जालना - कल्याण काळे
14 धुळे - डॉ. शोभा बच्छाव
15 अकोला - अभय पाटील