जाहिरात

Mahakumbh महाकुंभाबाबत खरगेंच्या वक्तव्यानं भूकंप, काँग्रेस अध्यक्षानं विचारला गंगा स्नावर प्रश्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमात स्नान केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ( Mallikarjun kharge) यांनी त्यांच्या या कृतीवर टीका करताना खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 

Mahakumbh महाकुंभाबाबत खरगेंच्या वक्तव्यानं भूकंप, काँग्रेस अध्यक्षानं विचारला गंगा स्नावर प्रश्न
मुंबई:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमात स्नान केले. महाकुंभाच्या निमित्तानं शाह सोमवारी प्रयागराजमध्ये उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ( Mallikarjun kharge) यांनी त्यांच्या या कृतीवर टीका करताना खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 

गंगा नदीमध्ये स्नान केलं तर गरिबी संपणार आहे का? असा प्रश्न खरगे यांनी विचारला आहे. भारतीय जनता पार्टी (भाजपा) नेत्यांमध्ये कॅमेऱ्याच्या समोर डुबकी लगावण्याची स्पर्धा सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस अध्यक्षांच्या वक्तव्यावर भाजपानं पलटवार केला आहे. खरगे अन्य कोणत्या धर्माच्या विरुद्ध असं बोलू शकतात का? असा प्रश्न भाजपा नेते संबित पात्रा यांनी विचारला आहे. काँग्रेस पक्षानं या विषयावर स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली. 'आम्ही सत्तेमध्ये आलो तर सनातन धर्म समाप्त करणार', असं वक्तव्य करणारे हेच खरगे आहेत याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )


काय म्हणाले खरगे?

काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले की, '(नरेंद्र) मोदी यांनी खोट्या आश्वसनांच्या जाळ्यात अडकवू नये. गंगेत डुबकी लगावल्यानं गरिबी समाप्त होते का? त्यामुळे कुणाचं पोट भरतं का? मला कुणाच्या श्रद्धेवर प्रश्न विचारयचा नाही. कुणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. 

खरगे पुढे म्हणाले की, ' या प्रकारचे लोकं देशाचं भलं करु शकत नाही. आमची देवावर श्रद्धा आहे. आम्ही रोज घरी पूजा करतो. सर्व महिला पूजा केल्यानंतर घराच्या बहेर पडतात. हा कोणता मुद्दा नाही. पण, धर्माच्या नावावर गरिबांचं शोषण ही समस्या आहे. 

( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
 

शाह यांनी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमात डुबकी लगाल्यानंतर काही तासांमध्येच खरगे यांनी वक्तव्य केलं आहे. काही प्रमुख संतांसह शाह यांनी दुपारी एक वाजता कुंभमेळ्यात स्नान केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वेगळी डुबकी लगावली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज आणि अन्य प्रमुख संतांसोबत यावेळी चर्चा देखील केली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com