गिरीश महाजनांना शरद पवारांनी घेरले, जामनेरमध्ये मोठा उलटफेर होणार?

विद्यमान आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र शरद पवारांचा हा डाव उधळण्यासाठी गिरीश महाजन यांनीही नवी रणनीती आखल्याची चर्चा आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
जळगाव:

मंगेश जोशी 

विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात मोठे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात शरद पवारांनी मोठी खेळी केली आहे. त्यांनी भाजपच्याच ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला आपल्या गळाला लावले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आणि मंत्री  गिरीश महाजन यांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र शरद पवारांचा हा डाव उधळण्यासाठी गिरीश महाजन यांनीही नवी रणनीती आखल्याची चर्चा आहे. जामनेर विधान मतदार संघातून गिरीश महाजन निवडणूक लढणार नसल्याची चर्चा आहे. याचे संकेत स्वतः गिरीश महाजन यांनी दिले आहे. मात्र कुणीही उमेदवार असला, तरी मात्र जामनेरमध्ये मोठ्या मताधिक्याने भाजपचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास गिरीश महाजन हे व्यक्त केला आहे. त्यामुळे शरद पवारांविरोधात गिरीश महाजनांची ही नवी रणनीती की महाजनांची माघार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे गिरीश महाजन यांची केंद्रात वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन एका नव्या चेहऱ्याला संधी देणार आहेत का? शिवाय हा नवा चेहरा कोण? याबाबतही उत्सुकता वाढली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपचे संकट मोचक असलेले गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत स्वतः गिरीश महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय व भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप खोडपे यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवारांना तगडा उमेदवार सापडला आहे. त्यामुळे महाजन यांच्या समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. असं असलं तरी गिरीश महाजनांकडून देखील नवी रणनीती आखली गेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जामनेरमधून निवडणूक न लढण्याचे संकेत महाजन यांनी दिले आहेत. त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहिण योजनेचा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर

दिलीप खोडपे हे गेल्या 30 वर्षापासून गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जात होते. मराठा समाजात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्या माध्यमातून गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची रणनिती शरद पवारांनी आखली आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जामनेरमध्ये जाहीर सभा घेऊन जयंत पाटील, अमोल कोल्हे व कट्टर राजकीय वैरी असलेले एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे गिरीश महाजनांसमोर एक मोठं आवाहन निर्माण झाले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - सरपंच-उपसरपंचांसाठी खुश खबर! मानधनात झाली घसघशीत वाढ, आता महिन्याला मिळणार...

जामनेर विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरण 

एकूण मतदार 3 लाख 18 हजार 370 

मराठा व कुणबी  - 1 लाख 43 हजार - एकूण मतदानाच्या सुमारे 40 ते 42 %

बंजारा व लभाना 30  हजार ( 8%) 
धनगर - 21 हजार (6 ते 7%)
गुजर - 22 हजार (6 ते 7%)
मुस्लीम 52 हजार (16 ते 17%)
इतर 46 हजार ( 14 ते 15%) 

ट्रेंडिंग बातमी - Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करणारे शिंदे कोण?

जामनेर विधानसभा मतदारसंघात मराठा व कुणबी समाजाची मते निर्णायक आहेत.  त्यामुळे दिलीप खोडपे यांचं मोठं आव्हान गिरीश महाजन यांच्यासमोर असेल. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत गिरीश महाजन यांना मिळालेल्या मतांमध्ये 40 ते 50 टक्के मतदान हे मराठा कुणबी समाजाचे होते. मात्र दिलीप खोडपे यांच्या माध्यमातून मराठा कुणबी समाजाचे 75% मत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. तर मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनाला मराठा समाजाने पाठिंबा दर्शवल्यास गिरीश महाजनांना ही निवडणूक अवघड जाऊ शकते अशी चर्चा आहे. त्यामुळेच की काय गिरीश महाजन यांनी देखील नवी रणनीती आखत जातीय समीकरणाच्या आधारावर बंजारा समाजातून नवा चेहरा देऊन विरोधकांचा डाव उधळवून लागण्याची रणनिती आखली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्याध्यापक निघाला हैवान! चिमुरडीच्या मृतदेहानं उघड केलं धक्कादायक रहस्य

त्यामुळेच निवडणूक न लढवण्याचे संकेत अप्रत्यक्षपणे गिरीश महाजन हे देत आहेत. जर नव्या चेहऱ्याला संधी मिळाल्यास बंजारा समाजाचे व गिरीश महाजन यांचे निकटवर्ती मानले जाणारे रामेश्वर नाईक यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात येईल. ते दिलीप खोडपे यांना टक्कर देवू शकतात. त्यामुळे जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून रामेश्वर नाईक हा नवा चेहरा गिरीश महाजन समोर आणू शकतात. शिवाय जामनेर नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करणाऱ्या गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना देखील विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ, 15 दिवस सुरू राहणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा कशी असेल?

एकीकडे गिरीश महाजन यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे गिरीश महाजन हे विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून आवाहन उभे केले जात असल्याने विरोधकांचा डाव उधळून लावण्यासाठी स्वतः निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत नव्या उमेदवाराला गिरीश महाजन संधी देण्याचा तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात जामनेर विधानसभा मतदारसंघात कोणती राजकीय उलथापालट होणार? कसे समीकरण बदलणार? की स्वतः गिरीश महाजन हेच निवडणूक लढवून आपलं वर्चस्व सिद्ध करणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.