जाहिरात

Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करणारे शिंदे कोण?

Akshay Shinde Encounter : पोलीस इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी गुन्हे शाखेच्या एन्टी एक्सटॉर्शन सेलमध्ये आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे. 

Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करणारे शिंदे कोण?
बदलापूर:

Akshay Shinde Encounter :  बदलापुरातील दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस त्याला तळोजा तुरुंगातून बदलापुरला घेऊन जात होते. त्यावेळी अक्षयने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेतली आणि फायरिंग केली, असा पोलिसांकडून दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस इन्स्पेक्टर संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर निलेश मोरे जखमी झाले आहेत. 

यादरम्यान पोलीस इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी आरोपीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असताना गोळी चालवली. यातच अक्षयचा मृत्यू झाला. संजय शिंदे यांच्या पिस्तुलीतून निघालेल्या गोळीतून अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. पोलीस इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी गुन्हे शाखेच्या एन्टी एक्सटॉर्शन सेलमध्ये आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे. 

Exclusive : एन्काऊंटरच्या 4 तासांपूर्वी अक्षयची आई-वडिलांशी भेट, लेकाच्या मृत्यूनंतर पालकांची पहिली प्रतिक्रिया

नक्की वाचा - Exclusive : एन्काऊंटरच्या 4 तासांपूर्वी अक्षयची आई-वडिलांशी भेट, लेकाच्या मृत्यूनंतर पालकांची पहिली प्रतिक्रिया

आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासोबत केलं काम...
प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी १९८३ मध्ये पोलीस दलात सामील झाल्यानंतर आपल्या करिअरमध्ये १०० हून जास्त गुन्हेगारांचं एन्काऊंटर केलं आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करणाऱ्य अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदेंचा समावेश होता. बदलापूर बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी टीममध्येही त्यांचा समावेश होता.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संजय शिंदे वादात...
संजय शिंदे यांचं नाव वादात अडकलेलं आहे. पोलीस चौकशीदरम्यान गँगस्टर विजय पालंडे यांच्या पोलीस कैदेतून पळून गेल्याच्या प्रकरणात संजय शिंदेनी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्यांचा गणवेश पालंडे यांच्या कारमध्ये असल्याची चर्चा आहे. संजय शिंदे यांना २०१४ मध्ये मुंबई पोलिसांनी टीममध्ये पुन्हा समाविष्ट करून घेतलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com