Guardian Minister : पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच; कोणत्या जिल्ह्यात कोणते नेते शर्यतीत? 

खातेवाटपानंतर आता कोणाकोणाला पालकमंत्रिपद मिळणार यावरुन चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. परंतू या खातेवाटपात अनेक दिग्गज मंत्र्यांचं डिमोशन झाल्याचं दिसून येत आहे. यात पहिला क्रमांक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाची मागणी केली होती. पण भाजपनं गृहखातं स्वत:कडेच ठेवलंय. अर्थमंत्रिपदही अजित पवारांच्या वाट्याला गेलंय. त्यामुळे शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याची जबाबदारी मिळाली आहे. 

नक्की वाचा - Guardian Minister : खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय शिरसाटांनी आधीच केलं जाहीर

दरम्यान खातेवाटपानंतर आता कोणाकोणाला पालकमंत्रिपद मिळणार यावरुन चर्चा सुरू झाली आहे. आज शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळणार असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यामुळे आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांनी जाहीर केलं असलं तरी भाजपचे अतुल सावेदेखील संभाजीनगरमधून शर्यतीत आहेत. 

नक्की वाचा - Cabinet Portfolio: जे खातं वडिलांच्या वाट्याला आलं तेच खातं लेकांना ही मिळालं, 'ते' दोन मंत्री कोण?

छत्रपती संभाजीनगर 
संजय शिरसाट 
अतुल सावे 

Advertisement

सातारा 
शिवेंद्रसिंहराजे भोसले 
जयकुमार गोरे 
मकरंद पाटील 
शंभूराज देसाई 

पुणे
अजित पवार
चंद्रकांत पाटील

नाशिक  
गिरीश महाजन
दादा भुसे
नरहरी झिरवाळ 
माणिकराव कोकाटे 

बीड  
धनंजय मुंडे
पंकजा मुंडे

कोल्हापूर  
प्रकाश अबिटकर 
हसन मुश्रीफ 

रायगड 
भरत गोगावले
अदिती तटकरे

मुंबई शहर आणि उपनगर 
मंगलप्रभात लोढा 
आशिष शेलार