राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. परंतू या खातेवाटपात अनेक दिग्गज मंत्र्यांचं डिमोशन झाल्याचं दिसून येत आहे. यात पहिला क्रमांक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाची मागणी केली होती. पण भाजपनं गृहखातं स्वत:कडेच ठेवलंय. अर्थमंत्रिपदही अजित पवारांच्या वाट्याला गेलंय. त्यामुळे शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याची जबाबदारी मिळाली आहे.
नक्की वाचा - Guardian Minister : खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय शिरसाटांनी आधीच केलं जाहीर
दरम्यान खातेवाटपानंतर आता कोणाकोणाला पालकमंत्रिपद मिळणार यावरुन चर्चा सुरू झाली आहे. आज शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळणार असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यामुळे आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांनी जाहीर केलं असलं तरी भाजपचे अतुल सावेदेखील संभाजीनगरमधून शर्यतीत आहेत.
नक्की वाचा - Cabinet Portfolio: जे खातं वडिलांच्या वाट्याला आलं तेच खातं लेकांना ही मिळालं, 'ते' दोन मंत्री कोण?
छत्रपती संभाजीनगर
संजय शिरसाट
अतुल सावे
सातारा
शिवेंद्रसिंहराजे भोसले
जयकुमार गोरे
मकरंद पाटील
शंभूराज देसाई
पुणे
अजित पवार
चंद्रकांत पाटील
नाशिक
गिरीश महाजन
दादा भुसे
नरहरी झिरवाळ
माणिकराव कोकाटे
बीड
धनंजय मुंडे
पंकजा मुंडे
कोल्हापूर
प्रकाश अबिटकर
हसन मुश्रीफ
रायगड
भरत गोगावले
अदिती तटकरे
मुंबई शहर आणि उपनगर
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world